…तर पाकिस्तानात टीव्हीच उरणार नाहीत; भारत पाक सामन्याआधी विनोदांचा पाऊस

0
नाशिक | चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसर्‍या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने बांगलादेशला पराभवाची धूळ चारली. त्यानंतर आधीच फायनलमध्ये प्रवेश केलेल्या पाकिस्तानसोबत भारताचा सामना येत्या रविवारी होणार आहे.

आता टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान असा महामुकाबला रंगणार म्हटल्यावर सर्वानीच रविवारचा दिवस सामन्याचा आनंद घेण्यासाठी राखून ठेवला आहे.

भारत पाकिस्तान सामना येत्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एक वेळा भारताने पाकिस्तानला मात दिली आहे. पाकिस्तान या सामन्यात पराभूत झाल्यानंतर त्यांच्या देशात अनेक ठिकाणी टीव्ही फोडल्यासारखे प्रकार घडले होते. सामना गमावल्यानंतर संघावर आणि संघ व्यवस्थापनावर पाकिस्तानच्या अनेक माजी खेळाडूंकडून टीका करण्यात आली होती.

दरम्यान, आता भारत पाकिस्तान संघामध्ये क्रिकेटचा महामुकाबला होणार असल्याने संदेश सध्या सोशल मीडियात पोस्ट होतांना दिसत आहेत. यात व्हिडीओ आणि लेखी संदेशांचा समावेश आहे. अनेकदा पाकिस्तानने केलेले गचाळ क्षेत्ररक्षण, नो बॉल, विनाकारण केलेली अपील यांची खिल्ली सध्या सोशल मीडियात उडवली जाते आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या एका सामन्यात भारताकडून पराभव पत्करावा लागला तेव्हा अनेकांनी टीव्ही फोडून राग व्यक्त केला होता. पुन्हा एकदा जर पाकिस्तान भारताकडून पराभूत झाले तर पाकिस्तानात टीव्हीच उरणार नाहीत असे गमतीशीर संदेश सध्या सोशल मीडियात पोस्ट होत आहेत.

अशा आहेत सोशल मीडियातील निवडक पोस्ट :

‘एकाच महिन्यात दोनदा दोनदा टीवी कसे फोडायचे?

पाकिस्तानमध्ये चिंतेची मोठी लाट.. 😂’


सत्तर वर्ष बाद भी.. इंग्लैंड ने फिर वही दोहराया..

तुम लड़ो आपस में….हम निकलते हैं 😝


आमची सगळी टीम देतो आम्हाला फक्त विराट द्या

– पाकिस्तान


 

LEAVE A REPLY

*