तोफखान्यातील चोर्‍या थांबता थांबेना

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- तोफखाना पोलीस ठाण्याच्या हाद्दीत चोर्‍या व घरफोड्यांचे प्रकार प्रमाणापेक्षा जास्त वाढले आहेत. रोज दोन ते तीन चोरीच्या घटना घडत असून त्या रोखण्यात पोलिसांना अपयश आल्याचे दिसत आहे.
गेल्या पंधरा दिवसात 20 पेक्षा जास्त चोरीच्या घटना दाखल झाल्या असून त्यात लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरीला जात आहे. यातील एक देखील चोरी उघड झालेली नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत.
प्रसाद सखाहरी किंबहुणे (रा. अमृतकल बिल्डींग, बालिकाश्रम रोड) यांच्या घरी समोवारी (दि.18) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास भर दिवसा चोरी झाली. यात सोने, चांदी व रोख मुद्देमाल असा 1 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला आहे. तर याच दिवशी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास काळुराम राजेंद्र घटमाळ यांच्या घरातील 2 लाख 75 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे.
इतकेच नव्हे तर चोर्‍या घरफोड्यांच्या बरोबरीने नगर तालुक्यात कमी इतकी रस्तालुट तोफखाना पोलीस ठाण्याच्या हाद्दीत होते. मंगळवारी उत्तर प्रदेशचे संतोष काश्यप यांना चाकुचा धाक दाखवून लुटले होते. तर शुक्रवारी (दि.15) डॉ. प्रशांत सुरकुटला यांच्या रुग्णालयात घुसून चोरट्यांनी 45 हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे.
चोरट्यांनी राजकीय पदाधिकार्‍यांची घरे देखील सोडली नसून रिपाईचे राज्य प्रवक्ते अशोक गायकवाड यांच्या घरी देखील चोरी केली आहे. त्यांनी चोरट्यांवर गोळीबार देखील केला. सर्व घटना सीसीटीव्हीत कैद होऊन देखील पोलिसांना चोरट्यांचा छडा लावता आला नाही. तोफखाना पोलीस ठाण्याच्या हाद्दीत होणार्‍या चोर्या या केवळ एकाच प्रकारच्या नसून सर्वसमावेशक आहेत. त्यामुळे पोलीस नेमके काय करतात हा प्रश्न सामान्य जनतेसमोर उभा ठाकला आहे.

पोलिसांवर भरवसा नाय –
तोफखाना पोलीस ठाण्याच्या हाद्दीत चोरी, घरफोडी झाली तर पोलिसांनी ती दाखल करुन घेण्यात आजकाल कमीपणा वाटू लागला आहे. कारण रोज इतक्या प्रमाणावर गुन्हे दाखल करणे म्हणजे प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. त्यामुळे फिर्यादींना नंतर या असा सल्ला दिला जातो. त्यातले काही लोक येतात. तर, काही या ससेमीरीकडे पाठ फिरवितात. काही फिर्यादी तर पोलिसांवर भरवसा नाही असे म्हणून स्वत:च घरफोड्यांचे तपास करू लागले आहेत.

पोलिस अधिकारी सांगतात. पेट्रोलिंग सुरू आहे. तपास सुरू आहेत. नाकाबंदी सुरू आहे. गस्त सुरू आहे. मात्र तोफखना हा राम भरोसे सुरू असून नाकाबंदी नाही, नेमून दिलेले कर्मचारी कामापेक्षा रिकाम्या तडजोडीत व्यस्त आहेत. त्यामुळे तोफखाना पोलीस ठाण्यात एखाद्या सक्षम अधिकार्‍याची गरज आहे.

LEAVE A REPLY

*