श्रीगोंद्यात घरफोडी : पाच लाखांचा मुद्देमाल चोरी

0
श्रीगोंदा (प्रतिनिधी)- श्रीगोंदा शहरातील मध्यवस्ती मधे असणार्‍या साईनगर परिसरात चोरट्यानी घरफोडी करुन तब्बल पाच लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे. तालुक्यात दरोडा आणि चोर्‍याचे सत्र थांबविण्यास पोलीस यंत्रणा सपशेल अपयशी ठरताना दिसत आहे.
मागील काही दिवसात श्रीगोंदा तालुक्यातपेडगाव येथे महिलेचा खुनासह दरोडा टाकला होता .तसेच मोटार सायकल चोरांची टोळी पकडली होती तसेच पोलीस ठाण्यासमोर जीवघेणा हल्ला तसेच शहरात अनेकांकडे विनापरवाना शस्र असल्याची पोलिसांनी माहिती मिळाली आहे.
त्यात पुन्हा आज श्रीगोंदा शहरातील साईनगर परिसरात राहणार्‍या रुक्मिणी शिवदास परहर यांच्या बंद घरावर चोरट्यानी डाव मारत तब्बल पाच लाखाचा मुद्देमाल चोरट्यानी लंपास केला आहे. त्यामध्ये कानातील हिर्‍याचे 4 सेट, सोन्याच्या बांगड्या 2, सोन्याचे कंगण 1, मोहनमाळ, दोन सोन्याच्या अंगठ्या, असा एकूण तब्बल पाच लाखाचा मुद्देमाल चोरट्यानी लंपास केला आहे.
ही माहिती श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांना समजताच त्यांनी तत्काळ घटनस्थळी धाव घेतली काही वेळात श्वान पथकाला पाचारण करण्यात आले श्वानाने काही अंतरावर जाऊन पंचायत समिती पर्यंत मार्ग दाखवला आहे. घटनस्थळी फारेन्सिक लॅब चे पथकही त्या ठिकाणी आले याबाबत परहर यांनी श्रीगोंदा पोलीसात फिर्याद दिली आहे .

 

LEAVE A REPLY

*