Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रजगाला मेड इन इंडियाची भूरळ पडली पाहिजे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जगाला मेड इन इंडियाची भूरळ पडली पाहिजे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

औरंगाबाद (संभाजीनगर) | वृत्तसंस्था 

भारतीय कंपन्यांसाठी महाराष्ट्रात उत्तम गुंतवणुकीसाठी वाव आहे. देशातील जनतेला मेड इन इंडियाची भर पडली पाहिजे असे उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.

- Advertisement -

मराठवाड्यातील उद्योजकांची क्षमता, येथील उत्पादने जगासमोर मांडत नवीन उद्योग आणून मराठवाड्याचा विकास करण्याच्या उद्देशाने मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज ऍण्ड ऍग्रिकल्चरतर्फे ‘अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्‍स्पो’ चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाकरे पहिल्यांदाच औरंगाबाद येथे गेले होते. यावेळी येथील जनतेने त्यांचे उत्साहाने, आनंदाने आणि अधिकाऱ्यांनी शासकीय शिष्टाचारानुसार स्वागत केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या