सिन्नरजवळ सतत होणारी वाहतूक कोंडी संपणार; बायपास कामाला गती

0

सिन्नर (सुनील जाधव) | सिन्नरजवळ सतत होणारी वाहतूक कोंडी संपणार असून बायपास कामाला गती मिळाली आहे. अनेक दिवसांपासून माळेगाव फाट्यानजीक थांबलेल्या कामाला आज पोलीस बंदोबस्तात सुरुवात झाली.

या परिसरातील अनेक विहिरी प्रशासनाकडून बुजवण्यात आल्याने या परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. अनुचित प्रकार टाळण्यासाठी या परिसरात प्रचंड पोलीस ताफा तैनात करण्यात आला होता.

एक दिवसात संपूर्ण रखडलेल्या कामाचे सपाटीकरण यावेळी करण्यात आले. परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरी बुजवल्या जाऊ नयेत उभी पिके ऐन उन्हाळ्यात जळतील अशा विनवण्या येथील महिला करत होत्या.

मात्र पोलिसांनी या महिलांना ताब्यात घेत कामाला गती दिली. त्यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण झाले होते.

सर्व फोटो : सुनील जाधव, देशदूत सिन्नर

 

LEAVE A REPLY

*