Thursday, April 25, 2024
Homeजळगावमालेगावची परिस्थिती भयावह – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मालेगावची परिस्थिती भयावह – आरोग्यमंत्री राजेश टोपे

चाळीसगाव – 

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे मालेगावहुन जालना जात असताना, त्यांनी बुधवारी रात्री 10 वाजेच्या दरम्यान चाळीसगाव येथे माजी आमदार राजीव देशमुख यांच्या निवासस्थानी धावती भेट दिली. याठिकाणी उपस्थितीत प्राशसकिय, वैद्यकिय आधिकार्‍यांकडून तालुक्यातील वैद्यकिय परिस्थितीचा आढावा घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तसेच मालेगाव येथील कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त करत, मालेगावच्या नागरिकांनी खबदारी न घेतल्यास मुंबईतील धारवीपेक्षा मालेगावची परिस्थिती भविष्यात भयावह होणार असल्याची ‘ चिंता ’ अनौपचारीक चर्चतून व्यक्त केली, मालेगावाच्या जवळच असलेल्या चाळीसगावात काळजी घेण्याच्या सूचना संबंधीत आधिकर्‍यांना दिल्याचे समजते.

- Advertisement -

मालेगाव येथे दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने मालेगाव हे महाराष्ट्रात कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहे. त्यामुळे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी मालेगाव येथे भेटे देवून तेथील परिस्थिती जाणून घेतली. त्यानतंर मालेगाव येथून जालना येथे जात असताना, त्यांनी वाटेत चाळीसगाव येथे माजी आमदार राजीव देशमुख यांच्या निवासस्थानी रात्री 10 वाजेच्या दरम्यान भेट दिली. याठिकाणी त्यांनी उपस्थितीत आधिकार्‍यांकडून तालुक्याच्या प्रशासकिय व वैद्यकिय परिस्थिताचा आढावा घेतल्याचे समजते. याप्रसंगी माजी आ.राजीव देशमुख, प्रातांधिकारी लक्ष्मीकांत सातळकर, तहसीलदार अमोल मोरे, पोलिस निरिक्षक विजयकुमार ठाकुरवाड, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय आधिकारी डॉ.बी.पी.बाविस्कर, तालुकावैद्यकिय आधिकारी डॉ.डी.डी.लांडे, डॉ.सुनिल राजपूत, प्रमोद पाटील, प.स.चे सभापती अजय पाटील, उपसंभापदी भाऊसाहेब पाटील, नगरसेवक सुर्यकांत ठाकुर, रामचंद जाधव, भगवान पाटील, रोशन जाधव, यांच्यासह पदाआधिकारी उपस्थित होते.

मंत्री राजेश टोपे यांनी तालुक्यातील वैद्यकिय परिस्थितांचा जणून घेतली असता, यावेळी डॉ.बी.पी.बाविस्कर यांनी कोरोनाबाबत तालुक्यात काय उपाय-योजना करण्यात आलेल्या आहेत, याची सविस्तर माहिती ना.राजेश टोपे यांना दिली. यावेळी अनौपचारीक गप्पा मारतांना ना.राजेश टोपे म्हणाले की, मालेगाव दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय आहे. तेथील नारिक प्रशासनास सहकार्य करत नसल्याची देखील माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे भविष्यात मालेगावात कोरोनाचा परिस्थिती मुंबईच्या धारवीपेक्षाही भयावह होणार असल्याचे त्यांनी चर्चेतून सांगीतले.

शासनातर्फे संपर्ण आरोग्य सुविधा मालेगावात पुरविल्या जात आहेत. परंतू तेथील नागरिक सहकार्य करत नसल्याचे समोर आल्याचे देखील ते म्हणाले. तसेच चाळीसगाव हे मोलगाव, धुळे, औरंगाबादच्या मध्यमभागी असल्यामुळे चाळीसगाव काळजी घेण्याची गरज असून बाहेरगावहुन येणार्‍यांवर खास लक्ष ठेवा अशा सूचना त्यानी संबंधीतांना दिल्याचे समजते. याप्रसंगी राजीव देशमुख यांनी राजेश टोपे यांच्याकडे पीपीकिडस व इतर आरोग्यबाबत साहित्य उपलब्ध करुन देण्याची मागणी केल्याची माहिती मिळाली असून आरोग्य मंत्र्यांनी देखील ते लवकरच उपलब्ध करुन देवू असल्याचे सांगीतले. तब्बल दिड ते दोन तासांच्या चर्चनतंर पुन्हा जालना येथे मंत्री मार्गस्थ झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या