#MeeToo #TIMEPOY : ‘सायलेन्स ब्रेकर्स’ बनले ‘टाईम पर्सन ऑफ द इयर 2017’

0

अमेरिकेतील प्रसिद्ध टाईम मासिकच्या प्रतिष्ठित ‘टाईम पर्सन ऑफ द इयर 2017′साठी यंदा कोणा एका व्यक्तीची नाही तर लैंगिक शोषण प्रकरणात आवाज उठविणारऱ्या सायलेन्स ब्रेकर महिला गटाची निवड करण्यात आली आहे.

टाईमच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारे एका गटाची निवड केली गेली आहे.

हॉलीवूड फेमस हार्वे विन्स्टीन याच्यावर लैंगिक शोषण व छळाचे आरोप झाल्यानंतर शेकडो माहिलांनी हॅश टॅग मी टू (#MeeToo) या नावाने सुरू करण्यात आलेल्या अभियानात आवाज उठविला आणि त्यांना सामोरे जावे लागलेल्या व्यथा जगासमोर मांडल्या.

सायलेन्स ब्रेकर या नावाने हा गट ओळखला जाऊ लागला. यात महिलांनी अनेक नामवंत पत्रकार, राजकारणी, उद्योगपती अशा प्रतिष्ठितांनी केलेली ही लंाछनास्पद कृत्ये जगासमोर आणली.

विविध देश, धर्म, जाती, समुदायातील महिला या अभियानात बोलत्या झाल्या.

प्रसंग घडले तेव्हा त्या गप्प राहिल्या होत्या कारण त्यावेळी त्यांना परिणामांची भीती वाटली होती. मात्र आता त्यांनी आपला आवाज दडपता येणार नाही याचे संकेत दिले होते.

 

LEAVE A REPLY

*