वीज अटकाव यंत्रणा केवळ शोभेपुरतीच; वीज कोसळण्यापूर्वी अलर्ट देण्याचा दावा ठरला फोल

0
नाशिक । वीज पडण्याआधीच वीज कोठे कोसळणार याचे ठिकाण 100 मीटरपर्यंत अचूक व एक ते दोन तास आधीच सांगण्याचा दावा इंडियन इन्स्टिट्युट ऑफ ट्रॉपिकल मेटरीऑलॉजी’ (आयआयटीएम) ने केला असला तरी नाशिक जिल्हयात मात्र अशा कोणत्याही प्रकारचा अलर्ट नागरीकांना दिला जात नसल्याचे दिसून येते. त्यामूळे जिल्हयात बसविण्यात आलेली विज अटकाव यंत्रणा केवळ शोभेपुरतीच उरली आहे.

विजा पडून मृत्यू होण्याच्या घटनेत महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे सांगितले जाते. पावसाळयात वीजा पडल्याने जीवितहानी, पशुहानी तर होतेच शिवाय मालमत्तेचेही नुकसान होते. मात्र प्रत्येकवेळी अशा घटनांनंतर मृत व्यक्तींच्या कुटुंबिंयाना शासकिय मदत देवून त्यावर मलमपटटी केली जाते.

मात्र या घटनांपासून बचाव व्हावा याकरीता ‘हवामान संशोधन केंद्र’ म्हणजेच इंडियन इन्स्टिट्युट ऑफ ट्रॉपिकल मेटरीऑलॉजी (आयआयटीएम) हवामान खाते (आयएमडी) ने वीज कोठे कोसळणार याचा ठिकाणा 100 मीटरपर्यंत अचूक व एक ते दोन तास आधीच सांगणार असा दावा ‘आयआयटीएम’ने केला आहे. याकरीता कोटयावधी रूपये खर्चुन विजांपासून हजारो नागरीकांचे मृत्यु टाळण्याच्या नावाखाली विज अटकाव यंत्रणा खरेदी केली गेली. नाशिकसह राज्यात 20 ठिकाणी हे सेन्सर बसवण्यात आले आहे.

नाशिक जिल्हयात 20 ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र विज कोसळण्याआधी कोणताही अलर्ट आपत्ती नियंत्रण कक्षाला मिळत नसल्याचे सांगण्यात आले. ज्या भागात ही यंत्रणा बसविण्यात आली आहे त्या परिसरातील केवळ अर्धा किलोमीटर पर्यंतच्या परिसरात वीज कोसळण्यापासून संरक्षण मिळू शकते. मात्र ज्या भागात या यंत्रणेची खरी गरज आहे त्या भागात मात्र आजही विजपडून मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडतच असल्यचे दिसून येते. त्यामूळे ही यंत्रणा केवळ शोभेपुरती असल्याचे दिसून येते.

मागील वर्षी 2016 मध्ये वर्षभरात वीज पडून 21 जणांचा मृत्यु झाला. यातील मदतीसाठी 18 जण पात्र ठरले तर 3 जणांना मदत नाकारण्यात आली. पात्र ठरलेल्या प्रकरणांमध्ये प्रत्येकी चार लाखाप्रमाणे 72 लाख रूपयांची मदत देण्यात आली. तर यंदाच्या वर्षी 1 जूनपासून 11 जणांचा विज अंगावर पडून मृत्यु झाला. यातील 10 प्रकरणांमध्ये प्रत्येकी 4 लाख याप्रमाणे 40 लाख रूपये मदत मृतांच्या कुटुंबियांना देण्यात आली. जिल्हयात 15 तहसिल मुख्यालयाच्या ठिकाणी ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. तसेच नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय, संदर्भ सेवा रूग्णालय, विभागीय आयुक्त कार्यालय नाशिकरोड , ॠयंबकेश्वर , सप्तश्रृंगी गड अशा एकूण 20 ठिकाणी ही यंत्रणा बसविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*