‘द नन’ सिनेमाला प्रेक्षकांची पसंती

0
मुंबई : ‘द नन’ या चित्रपटाला जगभरातील समीक्षकांकडून जरी संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी भारतात हा चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे. गेल्या तीन दिवसांत या चित्रपटानं ३० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. विशेष म्हणजे दोन आठवड्यापूर्वी ‘स्त्री’हा हॉरर कॉमेडी चित्रपटही प्रदर्शित झाला. या चित्रपटानं ८२ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाला हॉलिवूडची ‘द नन’ चांगलीच टक्कर देत आहे.

‘काँज्युरिंग’ सिरिजमधल्या आधीच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे ‘द नन’ कडेही मोठा प्रेक्षकवर्ग आकर्षित होत आहे. हा चित्रपट भारतात ५० कोटींहूनही अधिक कामाई करेल असं म्हटलं जात आहे.

LEAVE A REPLY

*