नाशिकच्या युवकांचा दुबईत मराठी झेंडा

0
नवीन नाशिक | दि. ३०, वार्ताहर- आपल्या भारत देशाची संस्कृती, परंपरा, सण-उत्सव देशातच सांभाळले, साजरे केले जातात असे नाही तर विदेशातही तयाची मोठी क्रेझ भारतीयांनी उभी केली असून विदेशी नागरिकांनाही त्याची भूरळ पडायला लागली आहे. नोकरी, व्यवसायानिमित्त अनेक भारतीय विदेशी विस्थापित झाले असून अनेक तरुणही जात आहेत. केवळ नोकरीच नाही तर राष्ट्राची, राज्याची संस्कृती, साहित्य, पंरंपरा टिकविण्यात त्यांनी मोलाची साथ दिली आहे. दुबईमध्ये वास्तव्य करणारे संयुक्त अरब एमीरतमध्ये ‘दुबई मराठी नाट्य महोत्सव २०१७’चे आयोजन करणारा मोरया इवेंटस्चे..

मोरया इवेंट्सचे संस्थापक मनोज पाटील यांनी मराठी नाट्य महोत्सव दुबईस्थित आखाती देशामध्ये प्रथमच आयोजीत केला. ह्या नाट्य महोत्सवात ‘साखर खाल्लेला माणूस’, ‘तीन पायांची शर्यत’, ‘कट्यार काळजात घुसली’ आणि ‘शांतेच कार्ट चालू आहे’ अशी चार दिग्गज कलाकारांनी भरलेली नाटके पाच महिन्यात आयोजीत केली. ह्या नाटकंांसाठी प्रशांत दामले, शुभांगी गोखले, संकर्षण कर्‍हाडे, रुचा आपटे, लोकेश गुप्ते, शर्वरी लोहकरे, संजय नार्वेकर, तेजश्री प्रधान, नीता पेंडसे, पराग डांगे, प्रियदर्शन जाधव, विशाखा सुभेदार, सुनील तावडे, मूग्धा कर्णिक, मयूरा पाळंडे, हृषीकेश शेलार, विजय केकंरे, संदेश भट आणि भालचंद्र (भाऊ) कदम यांनी दुबई मध्ये येऊन नाटक सादर केले.
ह्या कार्यक्रमासाठी अमेय खोपकर यांनी उपस्थिती देत संयोजकांचे कौतूक केले. या नाटकांसाठी थर्माकॉलचा सेट प्रशांत मूलावकर व स्वप्निल जावळे यांनी तयार केला. बिंदु पाटील, सोनाली चौधरी, वनीता गडिलकर, धनश्री पाटील, सुप्रिया शहा, मनीषा कारेगावकर, मनीषा कुमार, समीक्षा स्वप्निल, भारत गडिलकर, कमलेश कुमार, अभिजीत शहा, वीरभद्र कारेगावकर, स्वप्निल जावले व संदीप चौधरी यांच्या अथक परिश्रमाने ही नाटके दुबईमध्ये यशस्वीरित्या सादर करण्यात आली.
याच बरोबर ह्या नाटकं करता अल् आदील ट्रेडिंग ग्रूप, बँक ऑफ़ बरोडा, कॉम्पास ग्रूप, रीगल ग्रूप, ओम नमो, नोवा शश्रळींश हॉलिडेज़ यांनी प्रायोजित स्वीकारले. तसेच समर्थन प्रायोजक म्हणून विप्लवा थियेटर आणि फिल्म्स, पेशवा रेस्टॉरंट, मनीषा किचन, रॉयल कप, बेस्ट टूर्स ऑफर्स चे सहकार्य लाभले. ङ्गयाच बरोबर श्री. मनोज पाटील यांनी संयुक्त अरब एमीरत मध्ये राहणारे सर्व मराठी प्रेक्षकांचे आभार मानले आणि पुढच्या वर्षी सुदधा अशीच नवीन नाटके दुबईतील मराठी प्रेक्षकांना देऊ हि हमी दिली.
या नाटकानंतर सध्या मराठी वाहिनीवर गाजत असलेल्या ‘चला हवा येऊ द्या’ यांचाही इंटरनॅशनल दौरा होत असून त्याच अनुषंगाने मोरया गु्रुपतर्फे त्याचेही आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली. विशेष म्हणजे नाशिक व नवीन नाशिक येथील अनेक तरुण दुबईत नोकरी, व्यवसाय करीत असून त्यांच्यातील मराठीच्या अस्मितेने अरब एमीरतीमध्ये सर्व भारतीयांना एकत्रित आणत मराठी नाट्य क्षेत्राचे अनोखे दर्शन घडवले आहे.

LEAVE A REPLY

*