Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मान्सून लांबणार; ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये ‘मुसळधार’; हवामान तज्ज्ञांचा अंदाज

Share

नाशिक । प्रतिनिधी

मागील काही वर्षांपासून मान्सून पॅटर्न बदलला असून गतवर्षीप्रमाणे यंदा देखील पावसाला जुलैमध्ये प्रारंभ होणार आहे. आॅगस्ट, सप्टेंबर व आॅक्टोंबर महिन्यात जोरदार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला अाहे.

हवामान खात्याकडून दरवर्षी १ जूनला मान्सून केरळच्या किनाऱ्यावर धडकेल व एक आठवडयाने ७ जूनला कोकणकिनारपट्टीवर मान्सूनचे आगमन होईल असा अंदाज वर्तवला जातो.

मात्र, मागील काही वर्षापासून हे भाकीत खोटे ठरत आहे. निसर्गचक्रात मोठे बदल झाले असून त्याचा परिणाम मान्सूनच्या आगमणावर होत आहे. यंदा देखील समाधानकारक पाऊस होईल असे भाकीत हवामान शाळेने व्यक्त केले आहे.

पण गतवर्षीचा अनुभव लक्षात घेता यंदा देखील मान्सूनचा प्रवास लांबणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी पेरणीची घाई करु नये अन्यथा दुबार पेरणीचे संकट बळीराजावर येऊ शकते.

यंदा मे व जून मध्ये विस्कळीत स्वरुपाचा पाऊस पडेल. तर जुलैच्या पंधरवाडयापर्यंत मान्सून वेग घेइल. त्यानंतर तो महाराष्ट्रभर जलधारा कोसळतील. गतवेळी प्रमाणे आॅगस्ट, सप्टेबर व आॅक्टोबरमध्ये मान्सून दमदार कोसळेल. कदाचित महापूराचे संकट देखील येऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे.

लाॅकडाऊनमुळे प्रदूषणात मोठी घट झाली असून त्याचा फायदा मान्सूनला होईल. शेतकर्‍य़ांनी पेरणी करण्यापुर्वी जमिनीची तपासणी करावी. जेणेकरुन मातीचा पोत कळून कोणते पीक घ्यायचे हा निर्णय घेता येईल. तसेच शेतातील ढेकूळ फुटल्याशिवाय व कमीतकमी ६५ मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकर्‍यांनी पेरणी करु नये असा सल्ला देखील देण्यात आला आहे.


महापुराचे संकट

गतवेळी प्रमाणे आॅगस्ट, सप्टेंबर व आॅक्टोबरमध्ये तुफान पाउस होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे नद्यांना महापूर येऊ शकतो. ते बघता यंत्रणेने आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज रहावे लागणार असून वाॅटर मॅनेजमेंटचे नियोजन करावे लागणार आहे.


मे व जूनमध्ये विस्कळीत स्वरूपाचा पाऊस होईल. पुढील तीन महिने दमदार पाऊस होईल. शेतकर्‍यांनी शेतातील ढेकूळ फुटल्यानंतरच पेरणी करावी जेणेकरुन दुबार पेरणीचे संकट ओढवणार नाही.

– किरणकुमार जोहरे, हव‍मान तज्ज्ञ

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!