Video : द्वारका परिसरातील बेला पेट्रोल पंपाजवळ मिनीबस पेटली; जीवितहानी नाही

0

जुने नाशिक (फारूक पठाण) | द्वारका परिसरातील बेला पेट्रोल पंपाजवळ सायंकाळी साडेसातच्या सुमारास गुजरात पासिंगच्या एका मिनीबसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

वर्दळीच्या भागात अचानक मिनीबस पेटल्यामुळे परिसरात मोठी गर्दी जमली तसेच रस्त्याच्या मधोमध उभ्या असणाऱ्या मिनीबसमधून आगीची लोळ बाहेर पडत असल्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडीदेखील झाली होती.

मिनीबसमधील पर्यटक प्रवाशी अहमदाबादहुन निघालेले होते. शिर्डी, शनिशिंगनापुर दर्शननंतर त्र्यंबकेश्वरला जात असतांना द्वारका परिसरात अचानक गाडीतून धूर निघाला.

मिनीबसचा चालक राकेश वाघेला प्रसंगावधान राखत गाडी थांबविली. गाडीत 5 महिलांसह तीन पुरुष आणि तीन लहान मुले होती. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच याठिकाणी अग्निशमन दलाचे कर्मचारी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. तसेच वाह्तुक शाखेचे कर्मचारी याठिकाणी आल्यानंतर वाहतूक कोंडी दूर करण्यात येवून रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला.

 

LEAVE A REPLY

*