Friday, May 3, 2024
Homeजळगावपालकमंत्र्यांचा मदतीचा हात ; मुख्यमंत्री सहाय्यता निधीद्वारे दोन लाखांचा निधी मंजूर!

पालकमंत्र्यांचा मदतीचा हात ; मुख्यमंत्री सहाय्यता निधीद्वारे दोन लाखांचा निधी मंजूर!

जळगाव – प्रतिनिधी jalgaon

तालुक्यातील भोकर येथील सामान्य कुटुंबातील किरणकुमार पवार यांचा ७ वर्षीय यज्ञेशला (Fanconi Ameniya) म्हणजे शरीरात रक्त तयार होत नव्हते. त्यामुळे त्याला तामीळनाडूतील (Tamil Nadu) सी.एम.सी.हॉस्पिटला (CMC Hospital) अडमिट केलेले आहे. त्याच्या उपचारासाठी भोकर येथील सुभाषआप्पा पाटील, प्रमोद सोनवणे, बालाशेठ, अरुण सोनवणे, पुंडलिक सोनवणे यांनी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) यांच्याकडे मदतीसाठी साकडे घातले होते.

- Advertisement -

पालकमंत्री यांनी तत्काळ दखल घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सात वर्षीय यज्ञेशच्या उपचारासाठी मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून दोन लाखाचा निधी मंजूर करून घेतला. त्यामुळे यज्ञेच्या उपाचाराचा मार्ग मोकळा झाल्याने किरणकुमार पवार यांच्या परिवाराला मोठा दिलासा मिळाला आहे.

विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनीही आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’च्या माध्यमातून गरीब रुग्णासाठी आर्थिक मदत मोठ्या प्रमाणात खुली करून दिली आहे. महत्वाचे म्हणजे पूर्वी ज्या खर्चिक आजारांचा या योजनेत समावेश नव्हता त्या आजारांचा या योजनेत नव्याने समावेश करण्यात आला आहे.

प्रत्येक गोरगरीब रुग्णांला चांगले उपचार मिळावे हा या योजने मागचा मागचा उद्देश असून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजना रुग्णांसाठी जीवनदायी ठरत आहे. तसेच शासकीय आरोग्य यंत्रणा बळकट व सक्षम करून तेथेही गरजू व गरीब रुग्णांना चांगले उपचार मिळतील यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब लक्ष घालत आहे.

यासाठी आरोग्य विभागाला दुप्पट निधी देण्याची शासनाची भूमिका असून महात्मा फुले जन आरोग्य व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवून जास्तीतजास्त रुग्णांना वेळेत व चांगले उपचार मिळावे यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या