Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रVideo : राज्यपाल नियुक्त जागेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस

Video : राज्यपाल नियुक्त जागेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस

मुंबई | प्रतिनिधी 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांना सहा महिन्यांच्या आत विधानसभा किंवा विधानसभा या दोन्ही सभागृहापैंकी एका सभागृहाचे सदस्य होणे गरजेचे आहे. मात्र, सध्या कोरोना व्हायरसमुळे निवडणुका लांबणीवर ढकलण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

यामुळे राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा घटनात्मक पेच टाळण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये राज्यपाल नियुक्त जागेवर उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस करण्यात येणार असल्याची शिफारस करण्यात आली आहे.

याबाबतची माहिती राष्ट्रवादी नेते राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून दिली. ते म्हणाले, मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेल्या व्यक्तीला सहा महिन्यांच्या आत दोन्हीपैकी एका सभागृहाचे सदस्यत्व मिळवावे लागते.

मात्र, सध्या कोरोना व्हायरसची साथ आल्यामुळे निवडणुका लांबल्या आहेत. यामुळे राज्यात घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस राज्यपाल नियुक्त जागी करण्यात यावी असा निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतला आहे.

कोरोना व्हायरस आणि मुख्यमंत्री पदाचा मुद्दा हा या बैठकीतील महत्वाचा विषय होता. यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रीमंडळाच्या आग्रहाखातर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आजच्या बैठकीला अनुउपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आजची बैठक पार पडली.

- Advertisment -

ताज्या बातम्या