गुगल पिक्सल २ आणि पिक्सल २ एक्सएल स्मार्टफोन्स लॉन्च

0

गुगल आयोजित एका मोठ्या इव्हेंटमध्ये गुगल पिक्सल २ आणि पिक्सल २ एक्सएल हे दोन स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत.

अ‍ॅपलने गेल्या महिन्यात तीन नवीन आयफोन लाँच केले होते. यानंतर गुगलने ४ ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

यात कंपनीने गेल्या वर्षी सादर केलेल्या पिक्सल फोनच्या दोन अद्ययावत आवृत्ती सादर करण्यात येतील असे आधीच अनेक लीक्समधून समोर आले होते.

कार्यक्रमात पिक्सल २ आणि पिक्सल २ एक्सएल हे दोन मॉडेल्स जाहीर करण्यात आले.

या दोन्ही मॉडेलच्या कॅमेर्‍यांमध्ये गुगल लेन्स असणार आहेत.

गुगल पिक्सल २ आणि पिक्सल २ एक्सएल या मॉडेल्समध्ये अँड्रॉइड ओरिओ ही अद्ययावत प्रणाली देण्यात आली आहे.

ग्राहकांना प्रत्यक्षात १७ ऑक्टोबरपासून हे स्मार्टफोन्स मिळतील.

LEAVE A REPLY

*