Type to search

Featured हिट-चाट

‘द गर्ल ऑन द ट्रेन’ हिंदी रिमेकची पहिली झलक; परिणीती साकारतेय वेगळी भूमिका

Share
मुंबई | वृत्तसंस्था 
एमिली ब्लंटचा हॉलीवूड चित्रपट ‘द गर्ल ऑन द ट्रेन’च्या ऑफिशियल हिंदी रीमेकच्या घोषणेनंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पसरली आहे. विशेष म्हणजे, परिणीती चोपडा ही या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच परिणीतीचा या चित्रपटातील एक लुक समोर आला आहे. या चित्रपटाचे निर्देशन रिभु दासगुप्ता यांनी केले आहे.
या चित्रपटाबद्दल परिणीती म्हणते की, ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ शूट करत असताना मी एक निर्जनस्थळी आहे तिथे फक्त शुटींग आणि काम हेच आहे.
शुटींग करत असताना मला इतर काम करत असल्याचेही ती म्हणते. या चित्रपटाच्या शुटींगसाठी मी प्रत्येकदिवस शुटींगसाठी येण्यासाठी प्रयत्नशील असते.
चित्रपटाचे दिग्दर्शक रीभू सर हे सर्वश्रेष्ठ  दिग्दर्शक आहेत. त्यांच्यासोबत मी याआधी काम केलेय त्यामुळे या चित्रपटासाठी माझी निवड झाली आहे. या चित्रपटात मीरा एक मद्यपी आहे. जी भूमिका मी याआधी कधीही पडद्यावर निभावली नव्हती. त्यामुळे मी या चित्रपटासाठी झोकून देत काम करत आहे.
या चित्रपटाची शुटींग लंडनमध्ये सुरु झाली आहे. लवकरच या चित्रपटाच्या रिलीजची तारीख समोर येणार आहे.  परिणीती चोप्रा सह अदिती राव हैदरी, कीर्ती कुल्हारी आणि अविनाश तिवारी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!