पंचवटीतील वाघाडी परिसरातील जुगारअड्डा उध्वस्त

0

नाशिक | दि. ९ प्रतिनिधी- पंचवटीत वाघाडी परिसरातील एका घरामध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारत पोलीसांनी हा अड्डा उद्धवस्त केला तर अड्डा चालकासह २३ जुगार्‍यांच्या मुस्न्या आवळल्या. तर जुगार्‍यांकडून पोलिसांनी ३६ हजार ७३० रुपये जप्त केले आहेत.
जुगार अड्डा चालक बाळासाहेब छबीलाल पाटील (५१, रा. वाल्मिकनगर) याच्यासह २३ जुगार्‍यांना पोलीसांनी अटक केली. वाल्मिकनगरमध्ये गार्डनजवळील घरामध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची खबर पोलीसना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी सापळा रचला होता.

जुगारींना सुगावा लागू नये यासाठी महापालिकेच्या गार्डनपासून काही अंतरावरच वाहने थांबवून पोलीस पायी चालत एका घराजवळ पोहचले. पोलीसांनी त्या घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता, टेबलाभोवती जमून संशयित पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळत असल्याचे दिसून आला.

यावेळी पोलीसांनी जुगार अड्ड्याचा चालक बाळासाहेब छबीलाल पाटील याच्यासह २३ जुगार्‍यांना अटक केली. तसेच जुगार अड्ड्यामधून रंगीत टीव्ही, खुर्च्या, टेबल, पंखे असा ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ंयाप्रकरणी पंचवटी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह सहाय्यक आयुक्त विजयकुमार चव्हाण, पंचवटीचे गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक आनंद वाघ व पोलीस कर्मचार्‍यांनी ही कारवाई पार पाडली.

LEAVE A REPLY

*