आरएसएस विरुध्दचा लढा चालुच ठेवणार – प्रकाश आंबेडकर

0

नाशिक । दि.10 प्रतिनिधी
वैदिक हिंदु धर्माला विरोध असुन यात मनुस्मृतीला मोठे स्थान आहे. आम्ही संताचा जो हिंदु धर्म आहे, त्याला मानतो. राज्यघटना ही चार्वकापासुन तर तुकाराम महाराजापर्यत असणारे संत झाले यांच्या विचारणीला अनुसरुन जी राज्यघटना झाली, त्या राज्यघटनेला आम्ही मानतो. आत्तापर्यत हे कोणी मांडत नव्हते, ते आम्ही मांडतो. म्हणुनच आपल्यावर महु मध्ये हल्ला झाला, असे स्पष्टीकरण आज भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांची स्पष्ट केले. दरम्यान याच मुद्द्यावरुन आपला आरएसएस विरुध्दचा आमचा लढा चालुच राहणार असेही त्यांनी स्पष्ट केले.
नाशिक दौर्‍यावर आलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महु येथील झालेल्या हल्ल्यासंदर्भात बोलतांना आंबेडकर म्हणाले, तुकाराम महाराजांपासुन तर बुध्द, रविदास, गुरूनानक या संताच्या विचारणीला अनुसरुन राज्य घटना झाली आहे, तीला आम्ही मानतो. हे आत्तापयर्त कोणी मांडत नव्हते, मान्यही करीत नव्हते. मात्र यात फरक आरएसएसने केला. संत परंपरेवर आधारित राज्यघटना आम्हाला नको, आम्हाला मनुस्मृती आधारित राज्यघटना पाहिजे. आता त्यांनीच आम्हाला त्यांनीच फोड करुन सांगण्याची वेळ आली की मनुस्मृती काय आहे. सगळ्या संताच बंड हे मनुस्मृतीच्या विरोधातील बंड आहे. म्हणुनच संत तुकाराम महाराजांना वैकुंठाला पाठविले. हे आपण उघड मांडतो, म्हणुन संघर्ष होणार, महुचा प्रकार अपेक्षित आहे, हे प्रकार वाढतच जाणार, म्हणुनच आमचा आरएसएसच्या विरोधात लढा सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*