Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रअफझल खान कबरप्रकरणाचा वाद सर्वोच्च न्यायालयात, आज सुनावणी

अफझल खान कबरप्रकरणाचा वाद सर्वोच्च न्यायालयात, आज सुनावणी

मुंबई | Mumbai

प्रतापगडच्या (Pratapgad) पायथ्याशी असलेली अफझल खानची (Afzal Khan) कबर चर्चेत आलीय. गुरुवारी या कबरीच्या परिसरात असलेल्या अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता आज याच कारवाईप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.

- Advertisement -

या कारवाईला विरोध करणाऱ्या याचिकेबाबत सर्वोच्च न्यायालयात आज युक्तिवाद पार पडेल. स्थानिक प्रशासनाला अफझल खानाच्या कबरीच्या परिसरात असलेलं अतिक्रमण हटवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्याआधी हा वाद प्रचंड पेटला होता.

काहींनी अफझल खान यांची कबरच हटवली जावी, अशी मागणी केली होती. तर काहींनी अतिक्रमण विरोधी कारवाईचा आदेशच योग्य असल्याचं मत व्यक्त केलं होतं. दरम्यान, यावरुन आता राजकारण तापलंय. अशातच सर्वोच्च न्यायालयात आज पार पडणाऱ्या सुनावणीलाही महत्त्व प्राप्त झालंय.

अफझल खान स्मारक समितीच्यावतीने अ‍ॅड.निजाम पाशा यांनी सुप्रीम कोर्टात गुरूवारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेत कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम पाडताना स्मारकला कोणताही धक्का लागणार याची काळजी घ्यावी असे आदेश देण्यात यावे, अशी मागणी पाशा यांनी केली आहे. काल घटनापीठासमोर प्रकरण आले असले तरी घटनापीठाने शुक्रवारी सुनावनी करू असे सांगितले होते. यावर आज काय सुनावनी होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या