Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यानगर रचना विभाग एजंट मुक्त करण्याचा निर्णय

नगर रचना विभाग एजंट मुक्त करण्याचा निर्णय

नाशिक । प्रतिनिधी Nashik

बांधकाम तसेच आर्किटेक्ट क्षेत्रातील (In the field of construction as well as architecture )मान्यवर लोक सतत महापालिकेच्या मुख्यालय इमारतीत नगररचना विभागात ( town planning department ) येत असतात. मात्र नगररचना विभागात एजंटसह (Agent ) इतर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी राहते.

- Advertisement -

यामुळे मान्यवर लोकांनाही उभे राहावे लागते. म्हणून नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल यांनी कामकाजात अधिक पारदर्शकता यावी तसेच वेळेत नागरिकांचे काम व्हावे, यासाठी काही योजना आखल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून नगर रचना विभाग एजंट मुक्त करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच महापालिकेच्या नगररचना विभागात स्वागत कक्ष उभारून त्या ठिकाणी वेटिंग रूम तयार करण्यात येणार आहे.

महापालिकेत आर्थिक विषयाशी निगडीत असलेल्या इतर विभागापैकी नगररचना विभाग आघाडीवर आहे. महापालिकेत सर्वांचीच नजर खिळवणारा नगररचना हा विभाग पारदर्शक व एजंटमुक्त करण्यासाठी विद्यमान कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल यांनी निर्धार केला आहे.

या विभागात सकाळपासून सायंकाळपर्यंत गर्दीचा माहोल असतो. नेहमीच होणारी गर्दी टाळण्यासाठी व एजंटमुक्त कारभार करण्यासाठी सद्यस्थितीत या विभागाचा कारभार पाहणारे कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सकाळी साडेदहा वाजेपासून या विभागात गर्दी होते. दिवसभर गर्दी वाढत जावून सायंकाळी या विभागाला बाजाराचे स्वरूप येते.

बांधकाम जिव्हाळ्याचा विषय

महापालिकेत नगररचना विभाग नागरिकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा ठरतो. आयुष्यभर पुंजी जमा करून अनेकजण आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पुर्ण करतात. आपले घर अधिक सुरक्षित असावे याचा प्रयत्न प्रत्येकाचा असतो. त्यासाठी विविध परवानग्या या विभागाकहून घ्याव्या लागत असल्यामुळे अनेकांचा संबंध या विभागाशी येतो.आपले काम लवकर व्हावे, असा प्रयत्न प्रत्येकाचा असतो. घर,बंगला,इमारत या बांधकामांसाठी विविध प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागतात. सर्वसामान्य नागरिकांना विविध प्रकारच्या परवानग्या घेण्याची माहिती अवगत नसल्यामुळे व त्यांना सहजरित्या माहिती मिळत नसल्याने त्यांना एजंटांची मदत घ्यावी लागते. या एजंटांचे विविध प्रकार असून कामाप्रमाणे त्यांचे दर ठरलेले असतात. यातून सर्वसामान्य माणसाची मोठ्या प्रमाणात लुबाडणूक होते. या बाबत वेळोवेळी तक्रारीही करण्यात येतात.

सामान्य माणसाला त्यांचे काम स्वत:करता यावे. याचा आराखडा करीत आहेत. यातून नागरिकांची आर्थिक फसवणूक होणार नाही,याची दक्षता घेण्यात येणार असून या विभागात दिसणारी अनावश्यक गर्दी टाळता येणार आहे. कार्यालयात येणारे प्रतिष्ठित नागरिक असतात. त्यांच्यासाठी वेटिंग रूम तयार करण्यात येणार आहे.

संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता नगर रचना

- Advertisment -

ताज्या बातम्या