काळखोडे शिवारात रेल्वेमार्गावर आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

0

चांदवड | प्रतिनिधी : तालुक्यातील काळखोडे येथील शिवारातून जाणार्‍या रेल्वे मार्गावर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना आज शुक्रवार (दि.७) रोजी घडली.

सदर मृतदेह पुरूषाचा असून ४० ते ४५ वर्ष वयाचा असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मृतदेह चांदवड येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केला असून मृतदेहासोबत कुठल्याही प्रकारचा ओळखपत्र न सापडल्याने मृतदेहाची ओळख पटलेली नाही.

चांदवड पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अनंत मोहिते करत आहेत.

LEAVE A REPLY

*