Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

पिक विम्याची भरपाई नाही; सिन्नरचे  शेतकरी पदयात्रेने उद्धव ठाकरे यांना भेटणार 

Share

पंचाळे । प्रभाकर बेलोटे

प्रधानमंत्री  पिक विमा योजनेमध्ये विम्याच्या रकमा भरूनही  विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळाली नसल्याची तक्रार पंचाळे येथील डाळिंब उत्पादक शेतकरी शांताराम दशरथ थोरात यांनी केली आहे. विमा कंपनीच्या कार्यपद्धती विरोधात पदयात्रा काढून मुंबईत शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचा इशारा सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथील शेतकऱ्यांनी दिला आहे. थोरात यांनी ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी मध्ये एक हेक्टर तीन गुंठे डाळिंब पिकाच्या क्षेत्रासाठी 7 हजार 865 रकमेची  पिक विमा रक्कम महाराष्ट्र बँकेच्या वडांगळी शाखेमार्फत  मागील वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात भरणा भरणा केली होती. यावर्षी शासनाने सर्वत्र दुष्काळ जाहीर केला. पंचाळे परिसरात टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. शासन नियमाप्रमाणे दुष्काळ जाहीर होऊनही व पाण्याअभावी पिके जळाली तरी विमा कंपन्यांनी अद्यापही भरपाई दिली नाही.

थोरात यांनी डाळींब बागेच्या विम्यापोटी मिळणाऱ्या संरक्षित रक्कम 1 लाख 57 हजार 300 रूपायांची नुकसान भरपाई सदर विमा कंपनीकडून मिळणे अपेक्षित आहे. त्यांनी या संदर्भात संपर्क करुनही कंपनीने भरपाईबाबत कुठलेही ठोस उत्तर दिले नाही. हीच परिस्थिती इतरांच्या बाबतीत देखील असल्याने त्यामुळे शेतकऱ्यांचा शासनावर व विमा कंपन्यांवर विश्वास राहिलेला नाही. शासनाने यात हस्तक्षेप करून कंपन्यांना याबाबत आदेश देऊन मला व माझ्यासमवेत ज्या 50 शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला आहे त्यांना विमा कंपनीने जाहीर केलेली संरक्षित रक्कम त्वरित द्यावी अशी मागणी थोरात यांनी केली आहे . याबाबत येत्या आठवडाभरात  निर्णय न झाल्यास आपण व इतर शेतकरी पंचाळे गावापासून मुंबईपर्यंत पद यात्रा काढून  शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे  गाऱ्हाणे मांडणार असल्याचे थोरात यांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!