नाशिक-पुणे महामार्गावर अचानक धावती कार पेटली; प्रवासी सुखरूप

0
सिन्नर | नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर नांदूरशिंगोटे गावाजवळ धावत्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली.

सांगली येथील प्रवासी या कारमध्ये होते. पुण्याच्या दिशेने जात असताना नांदूरशिंगोटे गाव ओलांडल्यावर कारच्या बोनेट मधून अचानक धूर निघायला सुरुवात झाली.

चालकाने प्रसंगावधान राखत रस्त्याच्या कडेला कार थांबवून प्रवाशांना सुखरूप उतरवले. त्यानंतर आगीने वेढलेली कार जळून खाक झाली.

आगीची माहिती मिळाल्यावर सिन्नरचे उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे यांनी अग्निशमन बंब सिन्नरहून रवाना केला. मात्र कार पूर्ण जळाल्याने व आग विझल्याने हा बंब माघारी बोलवण्यात आला.

LEAVE A REPLY

*