दारणा नदीवरील पुल वाहतूकिसाठी खुला

0
एकलहरे | वार्ताहर- नाशिक-पुणे महामार्गावरील दारणा नदीवरील नवीन पुल अनेक दिवसांपासून वाहतुकीच्या प्रतिक्षेत होता. अखेर संबंधित विभागाने या पुलावरील एक बाजू सुरू केली आहे. चेहेडी बु ते सिन्नरपर्यंत चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या नवीन पुलावर नाशिककडून सिन्नरकडे जाणारी पुलावरील एका बाजूची वाहतूक सुरू झाली असून दुसरी बाजू कधी होणार याकडे वाहनधारकांचे लक्ष लागले आहे.

पुलावर एका बाजूची वाहतूक सुरू झाल्याने वाहतूक कोंडीचे प्रमाण घटले आहे. दुसर्‍या बाजूकडील वाहतूक सुरू करण्यास किरकोळ तांत्रिक कारण असून लवकरच या नवीन पुलावरून दुतर्फा वाहतूक सुरू होणार आहे. मात्र संपूर्ण पुलावरील पथदीप यंत्रणा अद्याप कार्यान्वित झालेली नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनधारकांचा गोंधळ उडतो. पुलाची दुसरी बाजू वाहतुकीसाठी लवकर खुली करण्याची मागणी जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

*