मनमाडच्या प्रवाशी रिझर्वेशन कार्यालयात धाडसी चोरी; एक लाख सहा हजार रुपये लांबविले

0
मनमाड(प्रतिनिधी) : मनमाड रेल्वे स्टेशनच्या रिजर्वेशन कार्यलयात धाडसी चोरी करून ड्रावरमध्ये ठेवलेले 1 लाख 6 हजार रुपये लंपास केल्याची घटना आज गुरुवारी दुपारी घडली.

या घटनेमुळे रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.ज्या रिजर्वेशन कार्यलयात कोणाला ही जाण्याची परवानगी नसते अशा ठिकाणी चोरटा पोहचला कसा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरेल्वेत मनमाडचे स्टेशन महत्वपूर्ण मानले जाते. येथून रोज सुमारे 100 पेक्षा जास्त प्रवासी गाड्यांची ये-जा होत असल्याने सर्व प्लॉटफॉर्म, तिकीट बुकिंग व रिजर्वेशन कार्यलयाजवळ प्रवाशांची मोठी गर्दी असते.

आज दुपारी रिजर्वेशन कार्यलयात कर्मचाऱ्यांनी 1 लाख 6 हजार रुपये ड्रावरमध्ये ठेऊन चहा पिण्यासाठी बाहेर गेले होते. चहा घेऊन परत आल्यानंतर या कर्मचाऱ्यांना एक अनोळखी व्यक्ती कार्यालयातून बाहेर पडत असल्याचे दिसून आले.

या इसमाने कर्मचाऱ्यांना पहिल्यानंतर पळ काढला त्याचा संशय आल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग केला मात्र तो त्यांच्या हाती लागला नाही.

हे कर्मचारी परत आले व त्यांनी ड्राव्हर उघडून पहिला असता त्यात ठेवलेली रक्कम गायब होती. सदर रक्कम अज्ञात व्यक्तीने लंपास केल्याचे उघड झाले.

या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून हा अज्ञात व्यक्ती आत कसा आला? त्याला हे कसे माहीत झाले की ड्रावरमध्ये मोठी रक्कम आहे? कार्यलयात कर्मचारी चहा घेण्यासाठी बाहेर जाताना त्यांनी लॉक का केले नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

LEAVE A REPLY

*