दीडशे शेतकर्‍यांची धरपकड

साहित्य पळविल्याने दोघांवर दरोड्याचे गुन्हे

0

नाशिक| दि. २ प्रतिनिधी – दोन दिवसांपासून पेटलेल्या राज्यव्यापी शेतकरी आंदोलनाचे जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले. वाहानांची तोडफोड, पोलीसांवर दगडफेक, किराणा साहित्याची लूट असे प्रकार जिल्ह्यात घडले.

या प्रकरणी कालपासून जिलह्यात १५१ शेतकर्‍यांची पोलीसांनी धरपकड केली. यामध्ये येवला येथे किराण्याचा ट्रकमधील साहित्य लूटल्या प्रकरणी दोघांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात प्रामुख्याने लासलगाव, येवला, सय्यद पिंपरी या ठिकाणी शेतकर्‍यांचेतीव्र आंदोलन झाले. पहिल्या दिवशी झालेल्या उद्रेकात लासलगाव येथे पोलीसांवर दगडफेक करण्यात आली होती. यामध्ये पोलीस गाड्यांचे नुकसान करण्यात आले.

तर लासलगाव येथे धान्य, किराणा, आंबे असे साहित्य घेऊन येणार्‍या गाड्यांमधील साहित्य रस्त्यावर फेकून त्याचे नुकसान करण्यात आले तर काहींनी हे साहित्य पळवून नेले. यावरून पोलीसांनी येवला येथील ४७ शेतकर्‍यांची धरपकड करून त्यांना सोडून दिले. लासलगाव येथील ८ तर आज सय्यद पिंपरी येथील शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते.

शहर आयुक्तालयातील आडगाव पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या लाखलगाव येथील १६ जणांनावर गुन्हे दाखल करण्यात आले. लाखलगाव येथे कोंबडयांची वाहतूक करणारे वाहन आडवून शेतकर्‍यांनी कोंबड्यांची सुटका करीत पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली होती.

याप्रकरणी १६ आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या विरूध्द आडगाव पोलिस ठाण्यात शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी व कोंबड्याचे नुक सान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुन्या नाशिकमधील चौकमंडई येथे राहणार्‍या अभिमान नामदेव पाटील यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

१ जून पासून जिल्ह्यात शेतकजयांचे आंदोलन पेटले असून त्याचे पडसाद गुरूवारी रात्री लाखलगाव येथे उमटले. रात्री दहा वाजेच्या सुमारास शेकडो ग्रामस्थांनी औरंगाबाद महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. यावेळी चांदोरे येथील गोंदे फाटा भागातील बारामती ऍग्रो कंपनीतून कोंबड्या भरून आलेले वाहन आंदोलनकर्त्यांनी आडविले.

याप्रसंगी संतप्त आंदोलनकर्त्यांनी वाहनास लावलेल्या जाळया उघड्या करून सुमारे ७८ हजार ९०० रूपये किमतीच्या कोंबड्यांना मुक्त केले. यावेळी पोलिसांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. दरम्यान याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक के.व्ही.पाटील करीत आहेत.

दरम्यान आज सय्यद पिंपरी येथे सकाळ पासून आंदोलन सुरू होते. येथील शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते. यामुळे गुन्हे दाखल झालेल्या शेतकर्‍यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

गुन्हे दाखल झालेले लाखलगावमधील शेतकरी
अर्जुन जाधव, समाधान जाधव, वाळू जाधव,प्रविण कांडेकर,उत्तम जाधव, बापू कांडेकर, संदिप जाधव, अशोक आहेर, रामदास जाधव, विनायक वलवे, तानाजी कांडेकर, कैलास वलवे आदींसह अन्य चौघे.

LEAVE A REPLY

*