गट क विभागातील शासकीय कर्मचार्‍यंाचे वय ५८ वरून ६०

अंमलबजावणी १ नोव्हेंबरपासून, अटीनुसार लाभ

0
नाशिक | दि. ५, प्रतिनिधी –राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या वर्ग क व वर्ग ड मधील कर्मचार्‍यांचे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीचे वय अनुक्रमे ५८ व ६० होते परंतु वर्ग मधील कर्मचार्‍यांच्या सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० करण्यावर शासन विचार करीत होते. त्याअनुषंगाने अटींना अनुसरून हे वय ६० करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भात ८ मे २०१७ रोजी शासन निर्णय जाहीर केला आहे.

या शासननिर्णयानुसार गट क संवर्गातील ज्या कर्मचार्‍यांची वयाच्या ५८ वर्षांपर्यंत ३३ वर्षांपेक्षा कमी सेवा होणार आहे अशा कर्मचार्‍यांसाठी शासन सेवेतील सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ५८ वरून ६० करण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णय हा १ नोव्हेंबर २०१७ पासून लागू करण्यात आल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे आता या नियमात बसणार्‍या क संवर्गातील कर्मचार्‍याना या निर्णयाचा लाभ मिळू शकणार आहे. शासनाच्या या निर्णयाचे विविध कर्मचारी संघटनानी स्वागत केले असून लाखो कर्मचारयांना या यामुळे लाभ होणार आहे.

सेवानिवृत्त होणारया कर्मचार्‍यांना अधिक दोन वर्षेे शासकीय सेवा करण्याची संधी या अनुंषगाने मिळणार आहे. परंतु यामुळे नविन पदनिर्मितीसाठी काही काळ नवीन युवकांना वाट पहावी लागणार आहे. हे कर्मचारी उशीरा सेवानिवृत्त होणार असल्याने काही वर्षे तरी नवीन भरतीसाठी वाट पहावी लागणार आहे.

याच कालावधीत सेवानिृत्त होणरया नागरिकांनाही या योजनेचा लाभ होवू शकणार आहे. शासनाकडेही अनुभवी मनुष्यबळ तसेच राहणार असल्याने त्याचा कामात नक्कीच फायदा होणार आहे.

LEAVE A REPLY

*