The Accidental Prime Minister movie review : चित्रपटामागचं राज’कारण’ !

0
मुंबई : संजय बारू यांच्या ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या पुस्तकावर आधारीत हा चित्रपट आहे. या चित्रपटातून माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व संजय बारू यांचे नाते खूप चांगल्यारित्या रेखाटण्यात आले आहे. तसेच या चित्रपटातून डॉ. मनमोहन सिंग यांचा राजकीय कार्यकाळ अनुभवायला मिळतो.

संजय बारू मनमोहन सिंग यांचे मीडिया सल्लागार असताना त्यांनी त्यांच्याबाबतीत केलेल्या निरीक्षणांचा उल्लेख या पुस्तकात केला असून तो आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळतो. या सिनेमात युपीए सरकारच्या काळातील न्युक्लियर डील व मनरेगा यांसारखे मुद्दे अधोरेखित करण्यात आले आहेत. त्याचबरोबर सोनिया गांधी यांचे पक्ष व मनमोहन सिंग यांच्यावर वचक असल्याचे चित्रपटात दाखविण्यात आले आहे.

या चित्रपटाची कथा फिरते ती अर्थातच मनमोह सिंग, गांधी घराणं आणि युपीए सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर घडणारं राजकरण यावर. २००४ साली सत्ता हाती आल्यानंतर सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नावाची घोषणा केली आणि अत्यंत मितभाषी असणारे मनमोहन सिंग पंतप्रधानाच्या खुर्चीवर विराजमान झाले आणि इथूनच चित्रपटाची कहाणी पुढे सरकत जाते.

अनुपम खेर यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भूमिका रुपेरी पडद्यावर उत्तमरित्या साकारली आहे. त्यांनी मनमोहन सिंग यांच्या बोलण्याची व चालण्याची पद्धत आणि छोट्या छोट्या गोष्टींवर खूप बारकाईने काम केले आहे. तर अक्षय खन्नाने अप्रतिम अभिनय केला असून तो प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच छाप उमटवून जातो. याशिवाय सुजैन बर्नेटने देखील सोनिया गांधींच्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. अहाना कुमरा (प्रियांका गांधी), अर्जुन माथुर राहुल गांधी) यांना रुपेरी पडद्यावर जास्त पाहण्याची संधी मिळत नाही. मात्र त्यांनीदेखील खूप चांगला अभिनय केला आहे.

LEAVE A REPLY

*