ठाणे : आयफोन X विकत घेणाऱ्या तरुणाची घोड्यावरून मिरवणूक

0

अॅपलकडून नुकतेच आयफोन 8 आणि आयफोन X या दोन नवीन स्मार्टफोन्सचे अनावरण करण्यात आले.

हे दोन्ही फोन भारतीय बाजारपेठेत दाखलही झाले. आयफोन 8 किंवा आयफोन X विकत घेणाऱ्या वर्गच वेगळा आहे.

ठाण्यात एका तरुणाने आयफोन X विकत घेण्यासाठी दुकानापर्यंत चक्क घोड्यावरून मिरवणूक काढली. यावेळी त्याच्या मागे बँडबाजा आणि वरातही पाहायला मिळाली.

महेश पालीवाल हा 20 वर्षांचा तरुण ठाण्यातील गोकुळनगर परिसरात राहतो. महेशला आयफोनचं प्रचंड वेड आहे. त्यामुळे नव्याने लाँच झालेलं आयफोन एक्स हे लेटेस्ट मॉडेल विकत घ्यायला जाताना तो घोड्यावर बसून गेला. शुक्रवारी संध्याकाळी ढोल ताशा घेऊन आणि घोड्यावर स्वार होऊन त्याने नौपाड्यातील एका दुकानातून हा फोन खरेदी केला.

LEAVE A REPLY

*