Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

भिवंडी येथील चार मजली इमारत कोसळून दोन जणांचा मृत्यू

Share

ठाणे : भिवंडी येथील शांती नगर परिसरात पिराणापाडा भागात चार मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोघांचे मृतदेह सापडले असून अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान घटनास्थळावर बचावकार्य वेगात सुरू करण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी भिवंडी येथील पिराणापाडा येथे हि दुर्घटना आज सकाळी सहाच्या सुमारास घडली. यावेळी इमारतीला तडे गेल्याचे नागरिकांच्या लक्षात आल्याने स्थलांतर करण्याचे प्रयत्न सुरू होते. त्या दरम्यानच ही दुर्दैवी घटना घडली आहे.

या दुर्घटनेमध्ये सिराज अहमद अन्सारी आणि आखीब या दोघांचा मृत्यू झालेला आहे. तर ढिगार्‍यात अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जखमींवर जवळच्या इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!