Type to search

Breaking News क्रीडा नाशिक मुख्य बातम्या

ठाणे मॅरेथॉन मध्ये नाशिकची आरती पाटील प्रथम

Share

नाशिक : ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आज ३० व्या ‘ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आल होते. यामध्ये महिलांच्या १० कि.मी. अंतर स्पर्धेत नाशिकच्या आरती पाटील (१.२७.४७ हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

स्मार्टसिटी, स्मार्ट मॅरेथॉन हे यंदाचे पालिकेचे घोषवाक्य आहे. यंदा प्रथमच महिलांची देखील २१ किमीची स्पर्धा यंदाच्या मॅरेथॉनचे मुख्य आकर्षण होते. रविवार सकाळी ६ वाजता या स्पर्धेला सुरुवात झाली. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्याच वयोगटातील नागरिकांचा या मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेही यावेळी धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते.

पुरुषांमध्ये करण सिंह याने १ तास १० मिनिटे आणि ३ सेकंदात २१ कि.मी.चं अंतर पार करत प्रथम क्रमांक पटकावला. धनवंत रामसिंह (१ तास १० मिनिटे १२ सेकंद) आणि ज्ञानेश्वर मोरघा (१ तास १० मिनिटे ३८ सेकंद) यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. प्राजक्ता गोडबोले (१.२८.२५) आणि अक्षय्या जडियार (१.३५.३४) यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!