Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

ठाणे : कळवा भागात दरड कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू

Share

ठाणे : मुंबई ठाणे परिसरात पावसाचा जोर ओसरला असला तरी काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घाट सुरूच आहेत. दरम्यान ठाणे येथील कळवा भागातील अटकोनेशवर नगरमधील आदर्श चाळीवर दरड कोसळल्याची घटना घडली असून यामध्ये दोन जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे.

दरम्यान अघटनेची माहिती मिळताच स्थानी पोलीस प्रशासन व अग्निशामन दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. बचाव पथकाकडून माती उकरण्याचे व तसेच तो बाजूला आकारण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून बीरेंद्र जसवार (४०) आणि सनी जसवार (१०) अशी मृत झालेल्यांची नावे आहेत. यातील जखमींवर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान प्रशासनाने धोका लक्षात घेऊन येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरु केले आहे. तात्काळ चाळीतून २० कुटुंबांना जवळच असलेल्या ज्ञानगंगा शाळेत राहण्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!