थॅलेसेमियाग्रस्त तीन वर्षाच्या बालिकेला नवजीवन

0

मुंबई, २७ – मुंबईतील किनाया शहा या तीन वर्षांच्या मुलीवर तिच्या वडिलांच्या स्टेम सेलसह बोन मॅरो ट्रान्सप्लँट प्रक्रिया करण्यात आली, मात्र त्यांचे स्टेम सेल अर्धे किंवा हापलॅडेक्टीकल मॅच होते. एकसारख्या पेशी असलेला दाता शोधण्यासाठी एचएलए टायपिंग अतिशय महत्त्वाचे असते, कारण एचएलए टाइप्स जनुकीय पातळीवर निश्चित झालेले असतात. अशावेळेस रूग्णाशी संबंधित व्यक्तीच्या पेशी जास्तीतजास्त मिळत्याजुळत्या असतात.

किनाया शहा तीन महिन्यांची असतानाच तिला थॅलेसेमियाचे निदान झाले होते. इतकी वर्ष तिला वेल्लोर, बेंगळुरू आणि पुणे येथे सातत्याने रक्तपुरवठा दिल्यानंतर तिच्या पालकांचा कोकिलाबेन धिरूभाई अंबानी हॉस्पिटल मधील डॉ. सांतनू सेन यांच्याशी संपर्क झाला. डॉ. सांतनू सेन यांनी किनायाला तीन महिने केमोथेरपी देत तिची रोगप्रतिकारशक्ती वाढवली, ज्याची तिच्या शरीराला ग्राफ्ट स्वीकारण्यासाठी मदत झाली. तीन महिने केमोथेरपी दिल्यानंतर डॉ. सेन यांनी किनायाच्या वडिलांच्या बोन मॅरोमधून स्टेम सेल घेतले व १० मे २०१७ रोजी तिच्यावर ट्रान्सप्लँट शस्त्रक्रिया केली.

थाल्सेमिया आजाराची गंभीर उदाहरणे हाताळण्यासाठी कोकिलाबेन धिरूभाई अंबानी हॉस्पिटलमधील (केडीएएच) डॉक्टरांनी ‘हिप्लोस्टेक्टीकल बोन मॅरो ट्रान्सप्लँट’ प्रक्रिया वापरण्यास सुरुवात केली असून त्याला लक्षणीय यश मिळाले आहे. एरवी ही प्रक्रिया ल्युकेमिया हा आजार बरा करण्यासाठी वापरली जाते. रूग्णाचे स्टेम सेल्स वापरून अर्धा हिप्लोस्टेक्टीकल किंवा त्याचा मॅच वापरल्यास रूग्णाची बरे होण्याची शक्यता खूप जास्त वाढते. ज्या रूग्णांना भावंडे नाहीत किंवा भावंडे पूर्ण मॅच होत नाहीत अशांसाठी ही प्रक्रिया वरदानासारखी आहे.

डॉ. सेन, पेडिअट्रिक बीएमटी कन्सलटंट आणि आँकॉलॉजिस्ट यांनी सांगितले. ‘जनुकीय चाचणीमध्ये तिच्या वडिलांचे स्टेम सेल्स ७०% समान असल्याचे आम्हाला दिसून आले व ट्रान्सप्लँटसाठी तेच वापरायचे आम्ही ठरवले. तिच्या शरीराने हे ग्राफ्ट स्वीकारले नाही, तर जोखीम नको म्हणून आम्ही किनायाचे स्वतःचे स्टेम सेल्सही आधीच गोठवून ठेवले होते. हापलॅडेक्टीकल ट्रान्सप्लँट्स मुळे बीएमटी जास्त सहज उपलब्ध झाली असून त्यामुळे लहान मुलांसाठी बरं होण्याची शक्यता अधिक वाढली आहे,’

व्यावहारिकदृष्ट्या सांगायचे झाल्यास दुसरे मूल पहिल्या मुलाच्या थॅलेसेमियासाठी योग्य मॅच असण्याची शक्यता केवळ २५% असते. थॅलेसेमिया रूग्णांना बरं होण्यासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लँटचा (बीएमटी) उपाय उपलब्ध आहे. बीएमटी  मध्ये बहुतांशवेळेस धाकट्या भावंडाचा पूर्ण मॅच स्टेम सेल वापरला जातो कारण तो रूग्णाच्या स्टेम मॅचची मिळताजुळता असतो. मात्र, या प्रक्रियेतील सर्वात मोठी उणीव म्हणजे भारतात हा आजार झालेल्या बहुतेक लहान मुलांना योग्य उपचार मिळत नाहीत.

‘हापलॅडेक्टीकल ट्रान्सप्लँट प्रक्रिया परत उद्भवलेला ल्युकेमिया आणि लिम्फोमामध्ये हमखास वापरली जात असली, तरी थॅलेसेमियामध्ये त्याच्या वापराने हा आजार बरा करण्यासाठी नवे क्षितिज तयार झाले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि भारतातील काही संस्थांनी केलेल्या या प्रक्रियेला चांगले यश मिळाले असून आम्हाला मुंबईतील योग्य रूग्णांसाठी ही सुविधा उपलब्ध करायची आहे,’ असे डॉ. सेन यांनी सांगितले. ‘बहुतेक रूग्णांसाठी रक्तपुरवठा आणि आक्रमक वैद्यकीय व्यवस्थापन हीच सर्वोत्तम उपचारपद्धती असते.’

बोन मॅरो ट्रान्सप्लँटेशनमध्ये एचएलए मॅच झाल्याने शरीर त्याचा स्वीकार न करण्याची तसेच ग्राफ्ट व्हर्सेस होस्ट डिसिजेसची (जीव्हीएचडी) शक्यता कमी होते. शरीराची रोगप्रतिकार यंत्रणा पेशींच्या पृष्टभागावर दिसणाऱ्या एचएलए प्रोटिन्सच्या मदतीने शरीराच्या ‘स्वतःच्या’ आणि ‘बाहेरून आलेल्या’ पेशी ओळखते. बीएमटीचा महत्त्वाचा फायदा म्हणजे यशस्वी ट्रान्सप्लँट झाल्यानंतर रूग्णाला नंतर रक्तपुरवठा देत राहाण्याची तसेच दीर्घकाळ औषधे घेण्याची गरज राहात नाही. 

LEAVE A REPLY

*