‘ठाकरे’ चित्रपट करमुक्त करण्याची मागणी

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे, की हा चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. ठाकरे यांचे संपूर्ण आयुष्य सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी समर्पित झालेले आहे. देश व राज्यातील हिंदू धर्मासह हिंदू संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी त्यांनी कायम आग्रही भूमिका घेतली. सर्वसामान्य माणूस व शेवटच्या घटकातील गरिबांचे प्रश्‍न सोडविण्याचे, युवकांना दिशा देण्याचे कार्य त्यांनी केले. हिंदू बांधवांसाठी त्यांचे कार्य प्रेरणादायी असेच राहिले आहे.

राज्यातील तमाम शिवसैनिक आजही ठाकरे यांच्या विचारानुसारच काम करत आहेत. त्यांचे हे कार्य व जीवनप्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. नवीन पिढीला, नवयुवकांना ठाकरे यांच्या कार्यातून समाजसेवेची प्रेरणा मिळावी यासाठी हा चित्रपट करमुक्त करण्यात यावा. चित्रपटाच्या तिकिटावरील शासकीय कर, शुल्क माफ केल्यास तिकिटाचे दर कमी होऊन सर्वसामान्य जनतेला हा चित्रपट पाहता येईल. यासाठी तो करमुक्त करावा, अशी मागणी कदम यांनी पत्रात केली आहे. या पत्रावर माजी महापौर सुरेखा कदम, नगरसेवक अनिल शिंदे, बाळासाहेब बोराटे, मंगल लोखंडे यांच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

*