Type to search

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या हिट-चाट

जाणून घ्या ठाकरे फिल्मच्या पहिल्या दिवसाची कमाई

Share
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बायोपिक असलेला ‘ठाकरे’ चित्रपट शुक्रवारी (25 जानेवारी) रोजी आपल्या भेटीस आला आहे. पहिल्याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी ‘ठाकरे’ चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल झाले. महाराष्ट्रभर पहाटेपासूनच चित्रपटगृहांबाहेर प्रेक्षकांनी रांगा लावल्या होत्या. त्यामुळे हा चित्रपट हिट होणार हे चित्र कालच स्पष्ट झाले होते.

‘ठाकरे’ हा चित्रपट मराठीसह हिंदी भाषेत प्रदर्शित झाला आहे. महाराष्ट्रातील बाळासाहेबांच्या चाहत्यांनी तसेच शिवसैनिकांनी अनेक ठिकाणी संपूर्ण चित्रपटगृहांचं बुकिंग केलं होतं. 20 कोटी रुपये खर्च करुन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली.

अभिजीत पानसे यांनी दिग्दर्शक पदाची धुरा सांभाळली आहे. बहुचर्चित ठरलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी लोकप्रियता मिळविली असून बॉक्स ऑफिसवर 6 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनीही ट्विट करत ही माहिती दिली.

ठाकरेची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये कमालीची होती त्यामुळे हा चित्रपट पहिल्या दिवशी २.७५ ते ३ कोटी रुपयांची कमाई करणार असा सरासरी अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र या अंदाजापेक्षाही अधिक कमाई या चित्रपटाने केली आहे.

ढोल ताशात फर्स्ट डे फर्स्ट शो
मुंबईतील वडाळ्याच्या कार्निव्हल चित्रपटगृहात भल्या पहाटे साडेचार वाजता चित्रपटाच्या फर्स्ट डे फर्स्ट शो ला तुडुंब गर्दी झाली होती. या शोसाठी संपूर्ण चित्रपटगृह सजवण्यात आलं होतं. पहाटे चार वाजता आधी पूजा करण्यात आली. त्यांनतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुधाने अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत पानसे यांच्या हस्ते चित्रपटाचे उद्घाटन झाले. त्यानंतर ढोलताशांच्या गजरात चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शोला सुरुवात झाली. त्यानंतर राज्यभर चित्रपटाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!