टीईटीचा निकाल अवघा साडेतीन टक्के : परीक्षेला बसले तीन लाख, पास झाले 9 हजार

0
पुणे(प्रतिनिधी)-राज्य परीक्षा परिषदेतर्फे राज्यभरात घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल अवघा 3.29 टक्के लागला असून राज्यभरातून 9 हजार 495 उमेदवार यासाठी पात्र ठरले असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांनी दिली. दुपारी 1 वाजता हा निकाल ऑनलाईन पध्दतीने परिषदेच्या www.mscepune.in या वेबसाईटवर जाहीर करण्यात आला.
गणोरे (वार्ताहर) – राज्यात जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत डी.एड पात्रता धारक असलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल 4.27 टक्के तर सहावी ते आठवीसाठी शिक्षक म्हणून अध्यापक बनू पाहणार्‍या बी.एड. धारक शिक्षकांचा निकाल 2.30 टक्के  लागला आहे. काल दुपारी यासंदर्भातील निकाल राज्य परीक्षा परीषदेच्यावतीने जाहीर करण्यात आला.
याबाबतची माहिती परीक्षा परीषदेचे आयुक्त सुखदेव  डेरे यांनी दिली. त्यामुळे या परीक्षेत सरांपेक्षा गुरूजी हुशार ठरल्याचे चित्र समोर आले आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षक होण्याकरिता शिक्षक पात्रता परीक्षा सक्तीची करण्यात आली. पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच शिक्षक भरतीसाठी  होणार्‍या केंद्रीय पात्रता परीक्षेला प्रविष्ठ होता येणार आहे.
या परीक्षांच्या बरोबर सरकारने नव्याने या वर्षापासून अभियोग्यता परीक्षा सुरू केली असून तीला प्रविष्ठ होण्याकरिता देखील टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यामुळे परीक्षा झाल्यानंतर अभियोग्यता परीक्षेला सामोरे जाण्याकरिता या निकालाकडे अऩेकांचे लक्ष लागून होते. राज्यात प्राथमिकसाठी 1 ते 5 करिता अध्यापन करू पहाणार्‍या डी.एड धारक मराठी माध्यमांची 1,53,316  विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले होते.
त्यापैकी 142051 विद्यार्थी प्रविष्ठ झाले तर त्यापैकी अवघे 6529 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेचे प्रमाण अवघे  4.60 टक्के इतके राहिले आहे. इंग्रजी माध्यमाकरिता 5149 विद्यार्थी प्रविष्ठ झाले तर त्यापैकी अवघे 104 विद्यार्थी उत्तीर्ण झाली आहेत.उत्तीर्णतेचे प्रमाण अवघे  2.02 टक्के इतके राहिले आहे. उर्दू माध्यमाकरिता 11485 विद्यार्थी प्रविष्ठ झाले तर त्यापैकी अवघे 130 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
उत्तीर्णतेचे प्रमाण 1.18  टक्के इतके राहिले आहे. उच्च प्राथमिक साठी बीएड पात्रता धारक असलेल्या मराठी माध्यमाकरिता 117407 विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले होते.त्यापैकी 108972 विद्यार्थी प्रविष्ठ झाले.2696 विद्यार्थी उत्तीर्ण झाली असून निकाल शेकडा 2.47 लागला आहे.
इंग्रजी माध्यमाकरिता 5741 विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले होते.त्यापैकी 5187 विद्यार्थी प्रविष्ठ झाली.23 विद्यार्थी उत्तीर्ण झाली असून निकाल शेकडा 0.44 टक्के  लागला आहे. उर्दू  माध्यमाकरिता 4579 विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले होते.त्यापैकी 4402 विद्यार्थी प्रविष्ठ झाले.13  विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल शेकडा 0.30 टक्के लागला आहे.

राज्यात इंग्रजी माध्यमांत 10890 विद्यार्थ्यांपैकी केवळ 127 विद्यार्थी उत्तीर्ण
उर्दू माध्यमात 16064 विद्यार्थ्यापैकी केवळ 143 विद्यार्थी उत्तीर्ण
2 लाख 97 हजार 677 पैकी 9 हजार चारशे 95 विद्यार्थी पात्रता परीक्षा उत्तीर्ण
शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाची गुणवत्ता पुन्हा चव्हाट्यावर
पदवी मिळूनही निकाल पाच टक्केच्या पुढे जाईना..
अध्यापक महाविद्यालयांच्या गुणवत्तेवरच या निमित्ताने प्रश्नचिन्ह

इंग्रजी माध्यमाचा निकाल कमी.. –
राज्यात इंग्रजी आणि उर्दू माध्यमांचा निकाल अंत्यत कमी लागलेला दिसत आहे. यावर्षीच्या इंग्रजी माध्यमांचा निकालाची अवस्था अंत्यत वाईट आहे. यामुळे येणार्‍या काळात इंग्रजी माध्यमांच्या शाळांना लागणारे शिक्षक मिळणे काहीसे कठीण होणार आहे.

LEAVE A REPLY

*