Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

खुशखबर! ‘टीईटी’ परीक्षा जानेवारीत; असे आहे वेळापत्रक

Share
टीईटी पात्रता नसलेल्या शिक्षकांचे काय होणार?, न्यायालयाने काढले आदेश, what will happen not qualifying tet examination students

नाशिक | प्रतिनिधी 

राज्यात दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिक्षक भरती होण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत  घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) येत्या जानेवारीत पार पडणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

१९ जानेवारीला ही परीक्षा पार पडणार आहे. पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित किंवा विना अनुदानित, कायमविना अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्तीसाठी ही परीक्षा उत्तीर्ण शिक्षकांना अनिवार्य आहे.

त्यामुळे आजच्या परीक्षा मंडळाच्या घोषणेने शिक्षक होऊ पाहणाऱ्या सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे. पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठीच्या टीईटी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया ८ ते २८ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.

तसेच  ४ ते १९ जानेवारी या काळात उमेदवारांना प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेता येणार आहे. या परीक्षेचा पहिला पेपर १९ जानेवारीला सकाळी १०.३० ते दुपारी १ तर दुसरा पेपर दुपारी २ ते ४.३० या वेळेत पार पडेल असे सांगण्यात आले आहे.

प्रवेशासंबंधीची सर्व माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी ती माहिती पाहून ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी केले आहे.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक

  • ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी : ८ ते २८ नोव्हेंबर
  • प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे : ४ ते १९ जानेवारी
  • शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-I दिनांक आणि वेळ : १९ जानेवारी सकाळी १०.३० ते दुपारी १
  • शिक्षक पात्रता परीक्षा-II दिनांक आणि वेळ : १९ जानेवारी दुपारी २ ते सायंकाळी ४.३०.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!