पुणेगाव पोहचकालव्याची चाचणी दृष्टीपथात

आमदार डॉ. आहेरांची जलसंपदामंत्र्यांशी चर्चा;डोॅ. कुंभार्डेंंकडून पाहणी

0
चांदवड प्रतिनिधी| आमदार डॉ. राहूल आहेर यांनी नूकतेच जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या दालनात झालेल्या बैठकित तालुक्यातील जनतेची पुणेगाव कालव्याबाबतची ४४ वर्षाची आस, सध्याचे पुरपाणी, पुरपाण्याने टंचाईवर होऊ शकणारी मात व चाचणीतील अडथळे आदी बाबी निदर्शनास आणून दिल्या.
याबाबत पालकमंत्री गिरीष महाजन यांनी सकारात्मक भुमिका घेतली. यापार्श्‍वभूमीवर जि. प. सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे, सभापती डॉ. नितीन गांगुर्डे यांनी अधिकार्‍यांसमवेत काजीसांगवी, दहिवद परीसरात कालव्याची पाहणी केली असून चाचणीच्या पुर्वतयारीचे कामे करण्याचे निर्देश संबंधितांना पालकमंत्र्यांनी दिल्याचे सांगण्यात आले आहे.
तालुक्याच्या माथी असलेला दुष्काळाचा शाप पुसण्यासाठी १९७२-७३ दरम्यान स्व. आमदार डॉ. ना. का. गायकवाड यांच्या दुर दृष्टीतून पुणेगाव धरणासह पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहच कालवा प्रस्तावित झाला. तेव्हापासून चांदवड तालुक्यातील विशेषत: दक्षिणपूर्व भागातील जनता या कालव्याकडे नजर लाऊन आहे.
मधल्या काळात दुर्लक्षित झालेल्या कालव्याची कामे माजी मंत्री तथा आमदार छगन भुजबळ यांनी बर्‍यापैकी मार्गी लावली. परंतू त्यांच्या १० वर्षाच्या काळात चाचणीपर्यंत मजल जाऊ शकली नाही.
चांदवडच्या खडकजांब शिवारापर्यंत पूर्वी पाण्याची चाचणी घेऊन गतवर्षी परसूल पर्यंत प्रत्यक्ष चाचणी झाली. दरम्यान आमदार डॉ. राहूल आहेर, जि. प. सदस्य डॉ. कुंभार्डे यांच्या प्रयत्नाने गतवर्षी दरसवाडी ते सोनीसांगवी पर्यंत कसे-बसे पाणी पोहचले. परंतू कालव्यातील  अडथळ्यामूळे प्रभावी चाचणी होऊ शकली नाही.
यावर्षी सध्या परिस्थितीत तालुक्याच्या पश्‍चिम पट्यात व दरसवाडी, केद्राई धरण परीसरात चांगला पाऊस झाल्याने केद्राई धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे तर दरसवाडी ८५-९० टक्के भरले आहे. आगामी काळात एखाद्या चांगल्या पावसाच्या हजेरीने हि धरणे ओव्हरफ्लो होणार आहे. तर पूर्वभागात अद्याप दमदार पाऊस नसल्याने नदी, नाले, बंधारे कोरडे ठाक असल्याने दुष्काळाची टांगती तलवार आहे.
सदर धरणातील पुरपाणी कालव्याद्वारे दहिवद, काजीसांगवी, सोनीसांगवी पुढील भागात पोहचल्यास पाणी टंचाईवर मात करणे शक्य असल्याने डॉ. कुंभार्डे यांनी आमदार आहेरांकडे या वास्तवासह कालव्यावरील प्रलंबित कामे, चाचणीतील अडथळे, अन् लाभ आदी बाबी आमदार डॉ. आहेर यांनी जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या समवेत बैठकित निदर्शनास आणून दिल्याने मंत्री महाजन यांनी सकारात्मक भुमिका घेत कालव्याच्या साफसफाई तात्काळ निर्देश दिले.
तसेच  प्रलंबित कामाबाबतही भुमिका घेतल्याने बहुप्रतिक्षेतील कालवा चाचणी प्रभावीपणे होणे शक्य आहे. या पार्श्‍वभूमीवर जि. प. सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे व सभापती डॉ. नितीन गांगुर्डे यांनी कार्यकारी अभियंता रमेश गावित, उपअभियंता व्हि. एम. बच्छाव, शाखा अभियंता आर. एम. शिरवाडकर यांच्या समवेत नुकतीच दहिवद, काजीसांगवी परीसरात कालव्याची पाहणी केली असून लवकरच कालव्याच्या सफाईला सुरूवात होणार आहे.
पाहणी करतांना नरेंद्र ठाकरे, प्रकाश ठाकरे, किरण ठाकरे, संजय बागुल, पोलीस पाटील दीपक ठाकरे आदींसह परीसरातील शेतकरी उपस्थित होते.
कालव्यावर खर्च करण्यास निर्बंध होते. परंतू कालव्या वहन क्षमतेतील अडचणी, पूर्व भागातील आर्त मागणी, पाणीटंचाई आदी वास्तव विशद करता जलसंपदामंत्री पालकमंत्री गिरीष महाजन यांनी प्रलंबित कामासह चाचणीपूर्व साफसफाई करण्याचे निर्देश विभागातील संबंधित अधिकार्‍यांना दिल्याने यास लवकर सुरूवात होऊन पुढील काळात चांगला पाऊस झाल्याच प्रभावी चाचणी घेणे शक्य होणार आहे.
-आमदार डॉ. राहूल आहेर, चांदवड-देवळा मतदारसंघ
आमदार डॉ. राहूल आहेर यांनी कालव्याची सदस्यस्थिती तसेच चाचणीतून टंचाई भागात होणारा लाभ पालकमंत्री महाजन यांच्या लक्षात आणून दिल्याने चाचणीच्या पूर्व कामांबाबत निर्देश देण्यात आले असून चाचणीतून काजीसांगवी दहिवद पुढील गावांना पुरपाण्याचा लाभ शक्य आहे. 
-डॉ. आत्माराम कुंभार्डे जि. प. सदस्य.

LEAVE A REPLY

*