नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर दहशतवादी हल्ला होतो तेव्हा…

0
नाशिक । वेळ दुपारी ठिक 11 वाजेची. अचानक तीन दहशतवादी अंधादुंध गोळीबार करत जिल्हाधिकारी कार्यालयात शिरतात. तीन कर्मचारयांनाही ते बंधक बनवतात.

या घटनेची माहीती मिळताच निवासी उपजिल्हाधिकारयांनी तातडीने व्हॉईसकॉलव्दारे विविध यंत्रणांशी संपर्क साधून याबाबत कळविले. काही क्षणांत दहशवादविरोधी पथक, शीघ्र कृती दलाचे अधिकारी व कमांडोजनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसराला घेराव घातला.

बचाव कार्यास सुरुवात झाली. अवघ्या तासाभरात दहशवाद्यांना ठार करून बंधकांना सुरक्षितरित्या बाहेर काढले. या घटनेने परिसरातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते मात्र हे मॉक ड्रिल असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

13 ऑक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्रांनी घोषित केल्यानुसार प्रतीवर्षी जागतिक आपत्ती धोके निवारण दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने आज जिल्हाधिकारी कार्यालयात ही रंगीत तालीम घेण्यात आली. इमारतीचा काही भाग 11.20 च्या दरम्यान निर्मनुष्य होतो.

त्यानंतर लगेचच बॉम्ब शोधक पथक, दहशदवाद विरोधी पथक, शीघ्र कृती दलाचे अधिकारी व त्यांचे कमांडों 11.32 च्या दरम्यान सर्व इमारतीस घेरतात. अन सुरु होतो हल्ला-प्रतिहल्ला..दोघा दहशतवाद्यांना कंठस्रान घालण्यात तर तिघांना ताब्यात घेण्यात दहशतवादविरोधी पथकाला यश येते.

तीनही बंधकांना सुरक्षीतरित्या बाहेर काढले जाते. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाकडुन अतिरेक्यांनी दडवून ठेवलेल्या बॉम्ब ची डॉगच्या सहाय्याने शोधाशोध सुरु होते. सापडलेला बॉम्ब सुरक्षित स्थळी घेऊन जाऊन तो निकामी केला जातो. अग्निशामक दलाचे अधिकारी पाणी आणि आग प्रतिरोधकाच्या सहाय्याने कार्यालयाला लागलेली आग विझवतात.

त्यानंतर इमारत सुरक्षित असल्याचा संदेश ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातुन 12.24 च्या दरम्यान सर्व अधिकारी कर्मचारयांना सायरन वाजवून दिला जातो. आपण सुरक्षित असल्याचे समजताच कार्यालयात अडकलेले कर्मचारी सुटकेचा नि:श्वास सोडतात.

हे मॉकड्रील जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, नागरी सुरक्षा दलाचे देशमुख, बॉम्ब शोधक पथकाचे अमृत पाटील. पोलिस निरीक्षक बाळकृष्ण शेजवळ, निळकंठ दुसाने, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे, मोहन कुलकर्णी ,डी.के.गोरडे आदींनी ही परिस्थिती हाताळली.

LEAVE A REPLY

*