Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

काश्मीरमध्ये गेल्या तीन वर्षांत 12 पोलीस कर्मचारी बनले दहशतवादी

Share
श्रीनगर – गेल्या काही काळापासून जम्मू काश्मीर पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडून दहशतवादाचा मार्ग पत्करला असून, या प्रकारामुळे पोलीस आणि सरकारची चिंता वाढली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये जम्मू-काश्मीर पोलीस दलामधील 12 पोलीस कर्मचारी 30 हत्यारांसह पसार होऊन दहशतवाद्यांना मिळाले आहेत.

बशीर दक्षिणी काश्मीरच्या वाची विधानसभा मतदारसंघाचे आमदार एजाज मीर यांच्या निवासस्थानाहून ८ शस्त्र घेऊन फरार झाला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, १२ पोलीस अशी ३० शस्त्रे घेऊन पसार झाले आहेत.  रशीद शिगन या कॉन्स्टेबलनेही नोकरी सोडून पोबारा केला आहे. रशीद हिजबुल मुजाहिदीनचा सक्रीय सदस्य होता आणि पोलिसात नोकरी करत असतानाच गेल्या १८ महिन्यात तो किमान १३ दहशतवादी हल्ल्यांमध्ये सामील होता, असा पोलिसांचा दावा आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!