Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

प्रजासत्ताक दिनी काश्मीरमध्ये हल्ला; लष्कराने केला ४ दहशतवाद्यांचा खात्मा

Share

श्रीनगर : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे. 4 दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले असून त्यांची ओळख अजून पटलेली नाही. श्रीनगरच्या खोनमोहमध्ये दहशतवादी घुसले होते. यावेळी एका इमारतीत लपलेल्या भारतीय जवानांनी या दहशतवाद्यांना घेरलं. यानंतर दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, तर तीन भारतीय जवान जखमी झाले आहेत.

दुसरीकडे श्रीनगरच्या खोनमोह परिसरात एका सरकारी शाळेच्या इमारतीमागे दोन दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि भारतीय सैन्याने संयुक्त ऑपरेशन करत या दहशतवाद्यांना ठार केले. काश्मीरमधून दहशतवाद कायमचा संपवण्यासाठी सैन्याने चंग बांधला असून गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात दहशतवादी ठार झाले आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!