अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसवर अतिरेकी हल्ला; 7 भाविकांचा मृत्यू

0
काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यामध्ये अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर साेमवारी रात्री अतिरेक्यांनी अंदाधुंद गाेळीबार केला.
या हल्ल्यात सहा महिलांसह सात यात्रेकरूंचा मृत्यू झाला.
३२ यात्रेकरू जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्रातील पालघर येथील दोन महिलांचा समावेश आहे.
वलसाड येथील ट्रॅव्हल कंपनीसोबत महाराष्ट्रातील भाविक अमरनाथ यात्रेला गेले होते.
प्रकाश वजानी, भाग्यमनी ठाकूर, रमेश बडोला, तिता मंजीलाल भाई, इजलिता डोगरा जखमी आहेत.
महाराष्ट्रातील पालघर येथील निर्मलाबेन ठाकोर आणि उषा सोनकर यांचा मृतांमध्ये समावेश आहे.
यात्रेकरुंची बस यात्रा पूर्ण करून परतत होती. बहुतेकदा सर्व वाहने ही सुरक्षा पथकाच्या ताफ्यासोबत जातात. मात्र, सोमवारी ताफा चार वाजताच परतला होता. दुसरीकडे, हल्ला झालेली ओम ट्रॅव्हल्सची बस ताफ्यापासून वेगळी झाली होती. बसमधील प्रवासी योगेश यांनी सांगितले की, ‘बस पंक्चर झाली हाेती. ते काढेपर्यंत दोन तासांचा वेळ गेला. यामुळे बस सुरक्षा ताफ्यापासून मागे राहिली. रात्री ८.२० वाजता बसवर अतिरेक्यांनी हल्ला केला. गोळीबार होत असताना बसचालकाने वेगाने बस पळवली. यामुळे अनेकांचा जीव वाचले. बसमध्ये एकूण ६० यात्रेकरू होते.’ घटनेनंतर दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी आपत्कालीन बैठक घेतली. यानंतर यात्रा सुरूच ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला.
सोमवारी यात्रेचा १३ वा दिवस व हिंदी पंचांगाचाही पहिला श्रावणी सोमवार होता.
केंद्र सरकारची घोषणा : यात्रा सुरूच राहणार
जम्मू-काश्मीर पोलिस आयजी मुनीर खान यांनी लष्कर व सीआरपीएफला पत्र लिहून अतिरेकी १०० ते १५० यात्रेकरूंना मारण्याचा कट रचत असल्याचे कळवले होते.
काश्मिरात इंटरनेट सेवा बंदी करण्यात आली आहे. अतिरेक्यांसाठी शोधमाेहीम सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती रात्री अनंतनागमध्ये आल्या.
१३ दिवसांत १.३४ लाख भाविकांनी यात्रा पूर्ण केली आहे.
८ जुलैला वानीच्या मृत्युदिनी खबरदारी म्हणून यात्रा स्थगित केली होती.

LEAVE A REPLY

*