दहा वर्षानंतर नगरला भरणार रेल्वे कोर्ट

0
पिपल्स हेल्पलाईन व राष्ट्रीय न्यायाग्रह आंदोलनाच्या पाठपुराव्याला यश
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रेल्वे स्टेशन येथे महिन्यांतून दोन दिवस रेल्वे कोर्ट भरविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले असता, बुधवार दि.21 जून रोजी सदर रेल्वे कोर्ट भरविण्यात येणार आहे. रेल्वे संबंधीत खटले व प्रकरणे निकाली निघण्यासाठी स्थानिक ठिकाणी रेल्वे कोर्ट भरविण्याची तरतुद असताना, गेल्या दहा वर्षापासून रेल्वे कोर्ट भरविण्यात आले नव्हते. रेल्वे संबंधीत खटल्याचा निपटारा करण्यासाठी पक्षकारांना मनमाड येथे जावे लागत होते. या प्रकरणी पिपल्स हेल्पलाईन व राष्ट्रीय न्यायाग्रह आंदोलनाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमुर्ती मंजुला चेल्लुर यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. यानुसार स्थानिक ठिकाणी रेल्वे कोर्ट भरविण्याचे उच्च न्यायालयाने आदेश दिले असताना दोनदा कोर्ट भरविण्यास टाळाटाळ करण्यात आली. मात्र आज रोजी रेल्वे कोर्ट भरणार असून, स्थानिक रेल्वे संबंधीत खटले चालविले जाणार असल्याची माहिती ऍड.कारभारी यांनी दिली.

LEAVE A REPLY

*