जळगाव : जिल्ह्यात आणखी दहा करोना बाधित रूग्ण आढळले

jalgaon-digital
1 Min Read

करोनाची शंभरी

जळगाव  –

जिल्ह्यातील अमळनेर व पाचोरा येथे स्वॅब घेतलेल्या 78 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आता नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 68 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून दहा व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

निगेटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये पाचोरा येथील 16, भडगाव येथील एक व अमळनेर येथील एकावण्ण व्यक्तींचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये पाचोरा येथील आंबेडकर नगर 21 वर्षीय तरूण, गिरडरोड येथील 49 वर्षीय पुरूष, आंतुर्ली येथील 50 वर्षीय पुरूष अशा तीन तर अमळनेर येथील आमलेशा नगरातील 6 व माळीवाडा येथील एक अशा 7 व्यक्तींचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 100 इतकी झाली असून त्यापैकी चौदा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

Share This Article