Type to search

नाशिक : मिंत्रा कंपनीला दहा लाखांना गंडा; व्यवस्थापकासह दोघांविरोधात गुन्हा

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : मिंत्रा कंपनीला दहा लाखांना गंडा; व्यवस्थापकासह दोघांविरोधात गुन्हा

Share

नाशिक | प्रतिनिधी

ऑनलाइन साहित्य पुरवणार्‍या कंपनीतील व्यवस्थापक, पर्यवेक्षक आणि डिलीव्हरी बॉयने संगनमत करून मिंत्रा कंपनीला दहा लाख रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुबंईनाका पोलीस ठाण्यात संशयितांंविरोधात फसवणूक तसेच अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरियाणा राज्यातील गुडगाव येथे असलेल्या पेखम सिस्टिम लॉजिस्टिक प्रा. लि. कंपनीचे नाशिक-पुणे रोडवर कार्यालय आहे. या कार्यालयामार्फत मिंत्रा डॉट कॉम या कंपनीकडील वेगवेगळ्या वस्तूंची ऑनलाइन विक्री होते.

पेखम कंपनीच्या नाशिक कार्यालयात संशयित निखील राजाराम आहेर हा व्यवस्थापक म्हणून तर विशाल रामदास माळेकर हा पर्यवेक्षक म्हणून काम करत होता.

तसेच अक्षय राजाराम आहेर हा डिलीव्हरी बॉयचे काम करीत होता. या तिघांनी मिळून फेब्रुवारी ते 30 एप्रिल या कालावधीत कंपनीने पाठवलेल्या 1 लाख 73 हजार 340 रुपयांच्या वस्तूंचे पैसे तसेच ऑफलाइन ग्राहकांनी दिलेल्या पैशांचा भरणा कंपनीत केला नाही.

तसेच संगनमत करून खोट्या नोंदी करीत पैसे स्वत:कडेच ठेवले. ही बाब कंपनीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संशयितांकडे पैशांची मागणी केली. त

रीदेखील त्यांनी पैसे भरले नाही. याबाबत संदीप संकपाळ यांनी तिघांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या महिला सहायक पोलीस निरीक्षक मोहिनी लोखंडे तपास करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!