रामकुंड परिसरांतील मंदिरे अद्यापही पाण्याखालीच

0

पंचवटी । दि. 29 प्रतिनिधी
गेल्या आठ दिवसापासून शहरात सुरू असलेल्या संततधार पावसाने शनिवारी काही प्रमाणात विश्रांती घेतली असली तरी गोदावरी नदी अद्यापही दुथडी भरुण वाहत असल्याने रामकुंड परिसरांतील बहुतांश मंदिरे पाण्याखालीच आहेत.

लहान-मोठ्या नद्या नाल्यांचे व गंगापुर धरणातून टप्याटप्याने होणार्‍या पाण्याच्या विसर्गामुळे  रामकुंड परिसरांत पाण्याची पातळी आठवड्याभरापासून कायम आहे.

शहरात संततधार सुरु असलेल्या पावसामूळे पंधरा दिवसात गोदावरी नदीचा पाण्याच्या पातळीत वाढ होऊन रामकुंड परिसरांत पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. रामकुंड परिसरांतील धार्मिक विधी अद्यापही रस्त्यावरच होत असल्याने सकाळच्या सुमारास रामकुंड येथे भाविकांची मोठी तारांबळ सुरुच आहे.

शनिवारी दुपार नंतर पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली असली तरी गोदावरी नदी दुथडी भरून वाहन असल्याने रामकुंड परिसरातील बहुतांश मंदिरे अद्यापही पाण्यातच आहे. यात प्रामूख्याने श्री चक्रधर स्वामी मंदिर, श्री बाणेश्वर महादेव मंदिर, श्री पाताळेश्वर मंदिर, यशवंतराव महाराज मंदिर, श्री खंडेराव मंदिर, श्री साईबाबा मंदिर अशी लहान-मोठी मंदिरात गोदावरी नदीचे पाणी कायम आहे.

तर परिसरातील लक्ष्मण सांडवा, दुतोंड्या मारुती सांडव्यावरून पाणी वाहत आहे. पावसाने उघडदिप घेतलेली असली तरी आज दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यत पाणी कायम होते. गाडगे महाराज पुलाखालील रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग बंदच आहे.

जुना बैल बाजार, श्री खंडेराव महाराज मंदिर पटांगण या परिसरात संपूर्ण पुराचे पाणी आहे. रामकुंड पार्किंग परिसरातील पाण्याची पातळी कमी झालेली नसल्याने येथील व्यावसायीकांचे जनजिवन पुर्वपदावर आलेले नाही. रामकुंड व गाडगे महाराज पुल परिसरांतील वाहन तळावर पाणी असल्याने भाविकांची वाहने रस्त्यातच उभी करावी लागत असल्याने रामकुंड परिसरांत वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम आहे.

LEAVE A REPLY

*