पावसाने तापमानात दहा अंश घट; नाशकात ढगाळ वातावरण, पावसाने हवेत गारवा

0
नाशिक । जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण, हे चित्र काही दिवसांपासून असल्याने , उष्णतेचा प्रभाव घटला आहे. तापमान थेट 9 ते 10 अंशांनी घटून सरासरी किमान तापमान 30 अशांवर स्थिरावले आहे.
उन्हाळ्यात मे महिन्याच्या अखेरीस आणि जुन महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही उन्हाची तिव्रता शिगेला होती.

तापमान सुमारे 38 ते 40 अंशांच्या पुढे कायम राहत असल्याने यंदा प्रखर उन्हाळा होता. हवेत उन्हाच्या झळा, प्रचंड तापलेले रस्ते आणि हवेतील आर्द्रता घटल्याने नागरीकांना उन्हाळ्यात उकाड्याचा प्रचंड त्रास झालेला नाशिकचा पारा सुमारे 42 अशांच्या पुढे सरकरल्याची नोंद हवामान विभागाकडे झालेली होती. तर मालेगावचा पाराही 45 अशांच्या आसपास जावून पोहोचलेला होता. त्यामूळे जिल्ह्यात उन्हाची धग प्रचंड होती.

जिल्ह्यात जून महिन्याच्या आरंभी पूर्व भाग असलेल्या नांदगाव, येवला, बागलाण, देवळा, चांदवड या भागात जुन महिन्याच्या आरंभी पाऊस झाला होता. तर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गारपीट झाली होती. या दोन वेळा झालेल्या पावसाने नागरिकांना उष्णतेतून दिलासा मिळालेला होता.

चालु आठवड्यात सलग तीन वेळा जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झालेला आहे. मान्सुन स्थिरावल्याने आकाश ढगांनी आच्छादलेले असते. त्यामूळे हवेत आर्द्रता वाढली आहेे. पारा सुमारे 30 ते 32 अशांवर जरी असला तरी गार हवेमूळे उकाड्याचा प्रभाव बाष्पामूळे हवेत घटला जात आहे.

काल नाशिक शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने जमीनीत पाण्याचा निचरा झालेला आहे. त्यामूळे जमीनीतील उष्णताही घटली आहे. हवेत आर्द्रता असल्याने हवेतील उकाडाही घटलेला आहे.

तर, आकाश ढगानी आच्छादलेले राहात असल्याने उष्णतेलाही प्रतिबंध निर्माण झालेला आहे. त्यामूळे तापमानातील घट वेगाने झाली आहे. आज नाशिकचे सकाळी तापमान सर्वाधिक 26 अंश होते, दूपारी 32 होते तर संध्याकाळी पुन्हा त्यात घट झालेली होती.

विदर्भ, मराठवाड्यापेक्षा वेगाने नाशिकचे तापमान सरासरी तापमानाच्या तुनलेत मोठ्या प्रमाणात घटलेले आहे. त्याचे कारण म्हणजे नैऋत्य मोसमी वार्‍यांनी आंध्र प्रदेश, हिंदी महासागराची पश्चिम किनारपटी व्यापली आहे. त्यामूळे मान्सूनची आगेकूच होत आहे. नाशिकमध्ये काल एकाच तासात सुमारे 92 मिलीमीटर पाऊस झाला होता. त्यामूळे सर्वत्र पाणीच-पाणी झालेले होते. त्याचा परिणामही वातावरणात गारवा निर्माण करण्यास हातभार लावणारा ठरला.

LEAVE A REPLY

*