Type to search

Breaking News Featured नाशिक फोटोगॅलरी मुख्य बातम्या

नाशिकसह जिल्ह्यात धुक्याची दुलई; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वात नीचांकी तपमानाची नोंद

Share
नाशिक @१०.३ अंश सेल्सियस; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वात नीचांकी तपमानाची नोंद, temperature mercury down in nashik district today, Nashik, 10.3 degree celsius

नाशिक | प्रतिनिधी

जिल्हयाच्या काही भागात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असले तरी उत्तर भारतात सुरु असलेल्या थंडीच्या लाटेने नाशिकच्या तापमानात मोठी घसरण झाली आहे.
नाशिककरांना बोचऱ्या थंडीने घेरले असून नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तपमानाचा पारा १०.३ अंशांपर्यंत घसरला. शहरात आज धुक्याची दुलई बघायला मिळाली. दुसरीकडे रस्त्यांवर सकाळी आठ वाजले तरीही वाहनांचे हेडलाईट्स सुरुच दिसून आले. मुंबई आग्रा रस्त्यावर अनाक वाहनधारकांनी धुक्याचे व्हिडीओ पोस्ट करत नववर्षाचे आनंद साजरी केला.
किमान त्प्मानासोबतच कमाल तपमानदेखील नाशिकमध्ये खालावले आहे. काहीसे ढगाळ वातावरण असले तरी नाशिककरांना हुडहुडी भरल्याचे चित्र आज सकाळपासून दिसून येत आहे.
पुढील आठवडाभरामध्ये थंडी अधिक प्रमाणात वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कालपर्यंत असलेले ढगाळ वातावरण आज ओसरले असून सकाळपासून लख्ख प्रकाश शहरात दिसून येत आहे.
उत्तर भारतातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांनी दक्षिणेकडे कूच केल्यामुळे महाराष्ट्रात थंडीची लाट पसरली असल्याचे तज्ञ सांगतात.  नाशिकसह राज्यातील प्रमुख शहरांचे किमान तापमान सरासरीपेक्षा कमी झाले आहे. पुढील चोवीस तासात वातावरण कोरडे राहणार असल्याने थंडीची तीव्रता वाढणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!