मुसळवाडी टेलटँकच्या भिंतीवरील दुचाकी व जड वाहतूक बंद

0

सार्वमत वृत्ताची पाटबंधारेकडून दखल

राहुरी स्टेशन (वार्ताहर)- भंडारदरा धरणाचा टेलटँक असलेला व राहुरी तालुक्यातील पूर्व भागाला वरदान ठरलेल्या मुसळवाडी तलावाच्या भिंतीला अनेक ठिकाणी लहान – मोठ्या स्वरूपाचे तडे गेले असून या तड्यांमुळे तलावाला धोका होण्याची शक्यता असल्याचे वृत्त काल सार्वमतने प्रसिध्द केले होते. या वृत्ताची पाटबंधारे विभागाने तातडीने दखल घेत भिंतीवरून होणारी दुचाकी व चारचाकी वाहनांची वाहतूक बंद केली.

मुसळवाडी तलावाची सुमारे 2 टीएमसी पाणी साठवण क्षमता असून तलावाची निर्मिती झाली, तेव्हा तलावाच्या उत्तर बाजूला मातीचा भराव करून भिंत करण्यात आली आहे. पाटबंधारे खात्याच्या दुर्लक्षामुळे या भिंतीवरून दुचाकी व चारचाकी वाहने जा-ये करीत होती. सध्या तलाव पूर्ण क्षमतेने पाण्याने भरलेला असल्याने पाण्याच्या दबावामुळे या भिंतीला धोका होण्याची भीती माजी सरपंच अमृत धुमाळ यांनी व्यक्त केली आहे. मुसळवाडी तलावातील पाण्यावर तलावाखालील सुमारे 20 गावांतील शेती ओलिताखाली आहे. तर अनेक गावाच्या शेतीला तलावाच्या पाझराचा लाभ होतो. तर मुसळवाडीसह अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना या तलावावर अवलंबून आहेत. दैनिक सार्वमतमध्ये प्रसिध्द झालेल्या वृत्ताची पाटबंधारे विभागाने दखल घेत भिंतीवरील वाहतूक बंद केल्याने लाभार्थी गावाच्यावतीने अमृत धुमाळ व ग्रामस्थांनी सार्वमतला धन्यवाद दिले आहेत.

LEAVE A REPLY

*