तेलंगणात बसला भीषण अपघात; ४० जण ठार

0

हैद्राबाद : तेलंगणातील राज्य परिवहन मंडळाची एक बसला आज भीषण अपघात झाला आहे. ही बस जगतीयाल जिल्ह्यातील घाटात कोसळली. या अपघातात तब्बल 40 जण ठार झाले आहेत. तर अन्य सुमारे 30 जण जखमी झाले आहेत.

मंगळवारी दुपारी पावणेबाराच्या सुमाराला शनिवारपेट गावाजवळ हा अपघात झाला. बसमध्ये एकूण 70 प्रवासी होते. त्यापैकी बहुतेक जण अंजनेय स्वामी मंदिराच्या दर्शनाहून परतत होते. त्यावेळीच त्यांच्यावर काळाने हा घाला घातला. एका साध्या वळणावरून ही बस थेट घाटात खोल कोसळली. योग्यवेळी ब्रेक लागले नसल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले असावे, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.

दरम्यान, या घटनेबद्दल मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तीव्र दुख: व्यक्त केले असून त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रूपयांची तातडीची मदत जाहींर केली आहे.

LEAVE A REPLY

*